Breking |जमिनीच्या वादातून ३ साडूमध्ये हाणामारी ; एकाच मृत्यू

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद प्रतिनिधी | जमिनीचा वाद टोकाला गेल्याने भांडणाचे रूपांतर हाणामारीत झाले आणि यात एकाच मृत्यू झाल्याची घटना वैजापूर तालुक्यातील डागपिंपळगाव सेटवस्तीवर घडली आहे. अशोक बापूराव डांगे ( वय ५६ ) असे मृताचे नाव आहे. मृतांचा मृतदेह शव विच्छेदन क्रियेसाठी पाठवला असून पोलीस या प्रकरणा बाबत अधिक तपास करत आहेत.

या भांडणात दोन साडूनी मिळून तिसऱ्या साडूचा खून केला असे प्राथमिक माहितीतून निष्पन्न झाले आहे. जमिनीच्या वादातून हा सर्व प्रकार घडल्याची देखील माहिती समोर आली असून या प्रकरणी विरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशोक डांगे यांना त्यांच्या साडूने जबर मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर अशोक डांगे यांनी देखील बचावात्मक धरपड केली. मात्र या हाणामारीत अशोक डांगे यांचा मृत्यू झाला.