पुलवामा जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन – दक्षिण काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यातील त्रालमध्ये बुधवारी पहाटे झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. या तिन्ही मृत दहशतवाद्यांची ओळख पटली आहे. जहांगीर रफीक वानी, राजा उमर मकबूल भट आणि उझेर अहमद भट अशी या तीन दहशतवाद्यांची नावे आहेत. या तीन  मृतांमध्ये हिजबुल मुजाहिद्दीनच्या कमांडरचा समावेश आहे.

दरम्यान त्रालमधील एका गावात हे दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा पथकांनी या गावाला घेराव घालून शोध मोहिम सुरु केली. त्यावेळी झालेल्या चकमकीत या तीन दहशतवाद्यांचा खात्मा झाला. जहांगीर रफीक वानी हिजबुल मुजाहिद्दीनचा त्रालमधील कमांडर होता. कमांडर हम्माद खानच्या मृत्यूनंतर सूत्रे त्याच्याकडे आली होती.

नोव्हेंबर २०१९ मध्ये मेहराजुद्दीन झरगर, त्यानंतर गुलाम नबी मीर या नागरीकांच्या हत्येमध्ये या दहशतवादी गटाचा सहभाग होता. राष्ट्रीय रायफल्स, स्पेशल ऑपरेशन ग्रुप, सीआरपीएफ आणि जम्मू-काश्मीर पोलिसांनी मंगळवार संध्याकाळपासून या दहशतवाद्यांची शोध मोहिम सुरु केली होती.