औरंगाबाद : भरदिवसा वर्दळीच्या रस्त्यावर कोयत्याने युवकावर वार करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार औरंगाबाद शहरात मंगळवारी संध्याकाळी घडला. शहरातील अजबनगर क्रांती चौक पोलीस स्टेशन भागात ही घटना घडली. अंबादास दानवे यांच्या कार्यालयाच्या समोरील रस्त्यावरती घडलेल्या या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, मंगळवारी संध्याकाळी ७ च्या दरम्याम, 2 ते 3 अज्ञात युवकांनी एका युवकावर धारदार शस्त्राने वार केला. या घटनेचा व्हिडिओ हॅलो महाराष्ट्रला मिळाला असून पोलिस आता यावर काय कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. ही घटना 15 ते 20 मिनिटे सुरु होती. भररस्त्यावर कोयता घेऊन तीन युवक एका युवकाला मारत होते. ही सगळी घटना घडत असताना बघ्यांची मोठी गर्दी अजब नगर भागामध्ये जमली होती. मारहाण करुन दोन युवक तिसऱ्या युवकाला स्कुटीवर बसवून पैठण गेट कडे जाणाऱ्या रस्त्याने निघून गेले.
https://www.facebook.com/aurangabadnewslive/videos/932604207528675
दरम्यान, तीन युवक घटनास्थळाहून निघून गेल्यानंतर काहीवेळातच क्रांती चौक पोलिस ठाण्याचे दोन कर्मचारी घटनास्थळी आले होते. यानंतर घटनास्थळी उपस्थित असणार्या नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर ते दोन कर्मचारीदेखील पैठणच्या दिशेने त्या युवकांचा शोध घेण्यासाठी गेले आहेत.