कोल्हापूर प्रतिनिधी । सतेज औंधकर
कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालूक्यातील आंवडी परिसरात पट्टेदार वाघाचा वावर सुरु आहे. या वाघाचे दर्शन अनेकांना झाल्याचे बोलले जात असताना आजरा शहरापासून १५ कोलोमीटर अंतरावर आंवडी धनगरवाडा आहे या वाड्यावर गेले १५ दिवस पट्टेरी वाघाचा वावर असल्याची माहिती मिळत आहे. काही दिवसापूर्वी वाघाच्या हल्ल्यात ४ बैल ठार झाले होते मात्र, वाघ सदृश्य प्राण्याच्या हल्यात बैल ठार झाल्याचे सांगून याबाबत वनविभागाने कोणताही स्पष्ट खुलासा केला नव्हता.
दरम्यान ,या परिसरात पट्टेरी वाघाचे दर्शन कॅमेरात कैद झाल्याने या भागात वाघाचा संचार असल्याच्या माहितीला दुजोरा मिळाला आहे. वाघाच्या अस्तित्वामुळं परिसरातील गावात भितीचे वातावरण पसरले आहे. काही विपरीत घटना घडण्याआधी वनविभागाने या वाघाचा बंदोबस्त करावा अशी मागणी गावकरी करीत आहेत.
दिवसभरातील ताज्या बातम्या तुमच्या मोबाईलवर मोफत मिळवण्यासाठी ”Hello News” टाईप करून 8080944419 या नंबरवर Whatsapp करा.