चंद्रपूर प्रतिनिधी | सुरज घुमे
चंद्रपूर शहरालगतच्या जगप्रसिद्ध ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील वाघाच्या शिकारीचा व्हिडीओ वायरल झाला आहे. या वाघानं एका अस्वलाची शिकार केली असून वाघडोह मेल असं या वाघाचं नाव आहे. वाघानं अस्वलाची शिकार करणं, ही घटना दुर्मिळ आहे. Fdcm च्या जुनोना जंगलात ही घटना घडली असून शिकारीनंतर वाघाला ऐटीत जाताना पाहून नागरिक चांगलेच आनंदीत झाले.
https://m.facebook.com/story.php?story_fbid=2208197352631013&id=1506067669510655
चंद्रपुरातील ताडोबा प्रकल्प म्हणजे वन्यजीवांचं नंदनवन. वाघ, बिबट यासह अन्य वन्यजीवांचा या नंदनवनात वावर आहे. यात आता काळ्या बिबट्याची भर पडली आहे. यातील माया वाघिणीसह वाघडोह मेल या वाघाचंही पर्यटकांना आकर्षण आहे.
ताडोबातील हा वाघ ‘बाप’ असून त्याचे वय 16 वर्ष आहे. ताडोबात सर्वाधिक वयाचा असलेल्या याच वाघडोह मेल या वाघानं fdcm च्या जुनोना जंगलाच्या एन रस्त्यावर अस्वलाची शिकार केली. यानंतर तो या भागात ऐटीत संचार केल्यावर जंगलात पसार झाला. शिकारीच्या या दुर्मिळ घटनेनंतर बघ्यांची मोठी गर्दी केली असून सोशल मिडियावर हा व्हिडीओ चांगलाच गाजत आहे.