Tips and Tricks : घरातील घाण झालेली स्विच बोर्डची बटणे फक्त 10 रुपयांर करा स्वच्छ

Tips And Tricks
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tips and Tricks : आपले घर साफ ठेवायचा प्रयत्न आपल्यातील प्रत्येकजणच करत असतो. विशेषतः जेव्हा घरी पाहुणे येणार असतील किंवा एखादा सण असेल तेव्हा. आपल्या घराची सफाई करताना आपण अनेक छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष देतो. मात्र, बहुतेकदा आपण घरातील इलेक्ट्रिक स्विच बोर्डकडे दुर्लक्षच करतो. कधी लक्षात आले तरी करंट लागण्याच्या भीतीने ते साफ करायचे आपण टाळतो.

How To Clean Switch Board| स्विच बोर्ड की सफाई| Switch Board Saaf Karne Ka Tarika | how to clean switch board with toothpaste | HerZindagi

मात्र संपूर्ण घर चकचकीत झाले आणि स्वीच बोर्डची बटणे खराब असतील तर ते कसे दिसेल??? याचे उत्तर अगदी सोपे आहे. ते चांगले दिसणार नाही. तर आज आपण अशा काही टिप्स जाणून आहोत, ज्याद्वारे घरातील इलेक्ट्रिक स्विच बोर्ड आणि बटण व्यवस्थित साफ करता येऊ शकेल. Tips and Tricks

How to clean a switchboard - Quora

वीज पुरवठा बंद करा

आपल्या घरातील इलेक्ट्रिकल स्विच आणि बोर्डची साफसफाई सुरू करण्याआधी कधीही सर्वातआधी वीज पुरवठा बंद करायला हवा. जेणेकरून साफसफाई करताना विजेचा धक्का बसणार नाही. तसेच बोर्डमध्ये जर फ्यूज असेल तर तो काढून टाका. असे केल्याने विजेचा धक्का बसणार नाही. तसेच यासाठी रबर किंवा चामड्याची चप्पल देखील घालता येईल. Tips and Tricks

16 Different Ways To Use Toothpaste You Never Knew About

टूथपेस्टचा वापर करा

आपली टूथपेस्ट देखील स्विच बोर्ड उजळवू शकते. यासाठी आवश्यकतेनुसार थोडी टूथपेस्ट घेऊन त्यानंतर दोन चमचे बेकिंग सोडा आणि काही थेंब पाणी घालून चांगले मिक्स करा. ही पेस्ट स्विच बोर्डवर लावून 10 मिनिटे तशीच असू द्यात. यानंतर, बोर्ड स्वच्छ कापडाने पूर्णपणे स्वच्छ करा. अशा प्रकारे स्विच बोर्ड नवीन असल्यासारखा चमकेल. Tips and Tricks

3 Ways to Clean Light Switches - wikiHow

स्पिरिट देखील वापरता येईल

हे लक्षात घ्या कि, बाजारात उपलब्ध असलेल्या कोणत्याही सामान्य क्लिनिंग स्पिरिटने देखील स्विच बोर्ड साफ करता येतील. याद्वारे बोर्डवर अनेक दिवसांपासून साचून राहीलेली घाण काढून टाकण्यास मदत होते. त्याचप्रमाणे सुती कापडावर स्पिरिट लावूनही स्विच साफ करता येतील. मात्र असे करत असताना स्पिरिटचा वापर कमी प्रमाणात करा, जेणेकरून ते स्विचच्या आत जाऊ शकणार नाही. Tips and Tricks

हे पण वाचा :
LIC ची जबरदस्त पॉलिसी! 4 वर्षांसाठी पैसे जमा करून मिळवा 1 कोटीचा फायदा
New Business Idea : घरबसल्या ‘हा’ छोटासा व्यवसाय मिळवून देईल मोठी कमाई
Recharge Plans : IPL सामने पाहण्यासाठी ‘हे’ आहेत सर्वात बेस्ट रिचार्ज प्लॅन
Earn Money : आता घरबसल्या कंपन्यांसाठी ‘हे’ काम करून दरमहा मिळवा लाखो रुपये
Small Saving Scheme : आता ‘या’ लहान बचत योजनांमध्ये पॅन-आधार शिवाय करता येणार नाही गुंतवणूक