हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । लॉकडाऊन दरम्यान जर आपण वर्क फ्रॉम होम करत असाल आणि आपल्या वायफायचा स्पीड स्लो वाटत असल्यास आता आपल्याला काळजी करण्याची आवश्यकता नाही कारण आज आम्ही येथे तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्ही तुमच्या स्लो वाय-फायचा स्पीड मोठ्या प्रमाणात वाढवू शकाल. चला तर मग जाणून घेऊयात या खास टिप्सबद्दल …
स्ट्रॉंग पासवर्ड वापरा
वाय-फाय गती वाढवण्याचा हा सर्वात सोपा मार्ग आहे. आपण एक स्ट्रॉंग पासवर्ड सेट न केल्यास आपल्याशिवाय इतर लोकही आपले Wi-Fi नेटवर्क देखील वापरण्यास सुरु करतील ज्यामुळे आपल्या डेटाची गती लक्षणीयरित्या कमी होईल. अशा परिस्थितीत आपण आपला पासवर्ड गुंतागुंतीचा राहील याची खात्री करुन घ्या आणि त्याबद्दल कोणालाही माहिती देऊ नका. तरच आपल्याला हाय स्पीड इंटरनेट वापरायला मिळेल.
वाय-फाय राउटर योग्य ठिकाणी ठेवा
आपल्याला हे माहिती आहे का जर आपला वाय-फाय राउटर योग्य प्रकारे ठेवला नसेल किंवा काही सामानांच्या मागे ठेवला असेल तर त्याचा स्पीड कमी होईल. म्हणून जेव्हा जेव्हा आपण राउटर ठेवता तेव्हा लक्षात ठेवा की त्याभोवती जास्त सामान नसावे.
वाय-फाय राउटरला जमीन अथवा फरशीवर ठेवणे टाळा
वाय-फाय राउटर पासून मिळणाऱ्या स्पीडवर धातू किंवा काँक्रीटसारख्या भिंतीच्या आवरणाचा प्रभाव पडतो, म्हणून खात्री करा की वाय-फाय राउटरच्या मार्गात कोणताही अडथळा नसेल.तसेच, राउटर हे जमिनीवर ठेवणे टाळा.
वाय-फाय वर लावलेल्या अँन्टीनाला सरळ ठेवा
सामान्यत: सर्व राउटरमध्ये बाहेरील बाजूस अँन्टीना असतो, जो अॅडजस्ट करून सिग्नलमध्ये सुधार केला जाऊ शकतो. बर्याच वेळा हे अँन्टीने झुकलेले असतात ते सरळ उभे करून सिग्नल दुरुस्त केले जाऊ शकतात.
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.