हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Password : सध्याचे जग हे डिजिटलायझेशनचे आहे. आजकाल डिजिटलायझेशनमुळे अनेक गोष्टी अगदी सहज सोप्या झाल्या आहेत. भारतातही डिजिटलायझेशनने खूप वेग पकडला आहे. आता सर्व काही डिजिटलच्या माध्यमातूनच केले जात आहे. याशिवाय सोशल मीडिया साइट्सचा वापरही खूप वाढला आहे. तसेच ट्विटर, इन्स्टाग्राम, जीमेल आणि फेसबुक या सोशल मीडिया साइटवरील आयडी नाही अशी लोकं शोधून सापडणार नाही. अशा परिस्थितीत या सर्व साइट्ससाठी पासवर्ड ठेवावे लागतात. विशेष म्हणजे या सर्वांसाठी वेगवेगळे पासवर्ड लक्षात ठेवणे अवघड जाते. अशा परिस्थितीत, सर्व सोशल मीडिया साइट्स आणि नेट बँकिंगसाठी लोकांकडून एकच Password वापरला जातो. मात्र त्यामध्ये मोठा धोका असतो. अशा परिस्थितीत पासवर्ड बनवताना खूप काळजी घ्यावी लागते…
काय करू नये ???
Password तयार करताना अनेक लोकांकडून एक सामान्य चूक केली जाते. यासाठी लोकं आपला वाढदिवस, नाव, मोबाईल नंबर आणि खेळाच्या नावाने पासवर्ड तयार केले जाते. अशा परिस्थितीत असे पासवर्ड हॅकर्सना सहजपणे क्रॅक करता येत नाहीत.
‘qwerty’ किंवा ‘123456’ सारखे पासवर्डपासून वापरू नका. अशा प्रकारचे पासवर्ड हॅकर्सकडून सहजपणे हॅक केले जातात.
डिक्शनरीमधील शब्द Password म्हणून कधीही वापरू नका, कारण हॅकर्स असे शब्द डिक्शनरीमध्ये स्कॅन करण्यासाठी आणि पासवर्ड क्रॅक करण्यासाठी सॉफ्टवेअर वापरले जातात.
काय करावे ???
कमीत कमी 8-12 शब्द असलेला Password ठेवा. हे लक्षात घ्या कि, पासवर्ड जितका लांब तितका चांगला. मोठ्या पासवर्ड तयार करण्यासाठी जास्त वेळ लागतो. अशा परिस्थितीत हॅकिंग खूप अवघड होते.
पासवर्ड तयार करताना अप्पर- आणि लोअर-केसमध्ये शब्द लिहिणे, तसेच नंबर्स आणि कॅरेकटर्सचा समावेश करणे (जसे की $£!) याद्वारे पासवर्ड सुरक्षित आणि हॅक करण्यास अवघड बनते.
Password तयार करताना मल्टी-फॅक्टर ऑथेंटिकेशन वापरा. टू-फॅक्टर ऑथेंटिकेशनसाठी हॅकर्सना खात्यात प्रवेश करण्यापूर्वी सिक्योरिटीच्या दोन स्तरांतून जाणे आवश्यक आहे.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या :
हे पण वाचा :
UPI-नेट बँकिंगद्वारे डिजिटल पेमेंट करताना लक्षात ठेवा ‘या’ 5 गोष्टी
Nora Fatehi ने सुकेश चंद्रशेखरशी संपर्क तोडला होता, मात्र जॅकलीन गिफ्ट्स घेत राहिली
IPL 2023 साठी मुंबई इंडियन्सकडून Mark Boucher ची मुख्य प्रशिक्षकपदी निवड
LPG : आता मिस्ड कॉल देऊन अशा प्रकारे घरपोच मिळवा सिलेंडर
लम्पीबाधित जनावरांच्या औषधांचा सर्व खर्च शासन करणार; राधाकृष्ण विखे पाटलांची घोषणा