राष्ट्रवादीची राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर; उपाध्यक्षपदी ‘या’ बड्या नेत्याची निवड

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने आपली राष्ट्रीय कार्यकारिणी जाहीर झाली आहे. यानुसार शरद पवार हे पक्षाचे अध्य्क्ष म्हणून कायम आहेत. तर प्रफुल्ल पटेल हे पक्षाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. राष्ट्रवादीच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यावर मोठी जबाबदारी देण्यात आली आहे. आव्हाड यांची राष्ट्रीय सरचिटणीस पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या या कार्यकारिणीत माजी मंत्री नवाब मलिक यांना डच्चू देण्यात आला आहे. मलिक हे सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपाखाली तुरुंगात आहेत. तर शरद पवार यांचे अत्यंत विश्वासू आणि एकनिष्ठ असलेले आमदार जितेंद्र आव्हाड यांची पक्षाच्या राष्ट्रीय सरचिटणीस पदी वर्णी लागली आहे.

याशिवाय प्रवक्ते म्हणून नरेंद्र वर्मा यांची सरचिटणीस, राष्ट्रीय प्रवक्ते आणि प्रभारी माध्यम, ब्रिजमोहन श्रीवास्तव यांची राष्ट्रीय सचिव आणि प्रवक्ते, धीरज शर्मा यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी युवक काँग्रेस व प्रवक्ते, सुश्री सोनिया दोहान यांची राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस आणि प्रवक्त्या, सीमा मलिक यांची राष्ट्रीय सरचिटणीस, राष्ट्रवादी महिला काँग्रेस तसेच क्लाईड क्रास्टो यांची राष्ट्रीय प्रवक्ते म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेस राष्ट्रीय पदाधिकारी :

1. शरद पवार – राष्ट्रीय अध्यक्ष
2. प्रफुल्ल पटेल – राष्ट्रीय उपाध्यक्ष
3. सुनील तटकरे – राष्ट्रीय सरचिटणीस
4. योगानंद शास्त्री – राष्ट्रीय सरचिटणीस
5. के. के. शर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस
6. पीपी मोहम्मद फैजल – राष्ट्रीय सरचिटणीस
7. नरेंद्र वर्मा – राष्ट्रीय सरचिटणीस
8. जितेंद्र आव्हाड – राष्ट्रीय सरचिटणीस
9. वाय. पी. त्रिवेदी – राष्ट्रीय कोषाध्यक्ष
10. एस. आर. कोहली – स्थायी सचिव