डोळ्याखालील ‘काळे डाग’ कमी करायचे आहेत ?? मग करा ‘हे’ सोपे घरगुती उपाय

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्रा ऑनलाईन । आपल्यातील प्रत्येकाला वाटतं की आपला चेहरा चांगला दिसावा. त्यासाठी अनेक जण विशेष प्रयत्न करत असतात. अनेक जणी त्यासाठी बाजरात उपलब्ध असणाऱ्या अनेक प्रकारच्या क्रीम लावत असतात. अन कधी कधी त्याचा फायदा होतो तर कधी त्याचा फायदा न होता. अनेक चुकीचे परिणाम निर्माण होतात. त्यासाठी आपण सलूनमध्ये जाऊन फेशिअल, फेस वॉश करतो. कधी कधी आपल्या चेहऱ्यावर एक लहानसा फोड आला तरी आपल्याला कधी तो फोड जातो आणि त्याला घालवण्यासाठी अनेक प्रयत्न करतो.

आपल्या चेहरा चांगला न दिसण्यापाठीमागे अनेक वेळा आपल्या डोळ्याच्या खालचे काळे डाग कुरूप दिसतात. आपला चेहरा किती जरी साफ आणि गोरा असला तरी डोळ्याखालील काळे डाग जात नाहीत. हे काळे डाग येण्याची असंख्य वेगवेगळी कारणे असू शकतात. तर आपण जाणून घेऊयात काळे डाग का येतात आणि ते घालवण्यासाठीचे उपाय. पुरेशी झोप घेणे, जास्त वेळ संगणक-मोबाईलवरवर घालवणे, रात्रभर जागे राहणे. अनेक वेळा मानसिक तणाव याचा शारीरिक कमजोरी, थकवा याचा परिणाम डोळ्यांखालील त्वचेवर होतो आणि डोळ्यांखाली काळे घेरे तयार होतात. या समस्येचा बहुतेकजणांना त्रास होत असून त्यामुळे चेहऱ्यावरील आकर्षकपणा नाहीसा होतो.

काळे डाग घालवण्यासाठी करा हे उपाय-

बदाम तेल-

बदाम तेलाचा वापर हा जसा खाण्यासाठी केला जातो. डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बदामाच तैलही उपयोगी आहे. बदामाचं तेल डोळ्याच्या आजूबाजूला लावून काही वेळ तसेच ठेवा. त्यामुळे आपल्या डोळ्याच्या आजूबाजूचे काळे डाग निघण्यास मदत होऊ शकते.काही वेळ तेल लावून ठेवल्यानंतर नंतर आपल्या बोटानी १० मिनिटे हळूहळू मसाज करा. त्यानंतर चेहरा स्वच्छ करा.बदाम रात्री दुधात भिजवून ठेवावे. सकाळी त्याची पेस्ट करुन लावावी. मध आणि बदामतेल सम प्रमाणात घ्या. याला व्यवस्थित मिसळा. या मिश्रणाच नक्कीच फायदा होतो.

टी बॅग-

काळे डाग दूर करण्यासाठी टी- बॅगचा वापर केला जातो. टी बॅग मध्ये मोठ्या प्रमाणात टॅनिक या तत्वामुळे डोळ्यांना आलेली सुज आणि डोळ्यांखालील सर्कल दूर होतात.

टोमॅटो-

टोमॅटो हे आहारात ज्या पद्धतीने चांगले आहे . त्याच पद्धतीने त्याच्या रसाचा वापर चेहऱ्यासाठी केला जातो. टोमॅटोच्या रसात लिंबाचा रस, थोड बेसन आणि हळद घालून मिश्रण तयार करा. हे मिश्रण काही वेळ तसेच ठेवा. तयार झालेले हे मिश्रण डोळ्यांच्या आजूबाजूला लावा आणि २० मिनिटांमध्ये चेहरा धुवून घ्या. चेहरा धुताना थंड पाण्याचा वापर करावा. आठवड्यातून तीन ते चार वेळा असे केल्यास तुम्हाला फायदा जाणवेल. रात्री किंवा सकाळी उठल्यावर हे मिश्रण करावं.

बटाटा-

बटाटा हा जसा आहारात समावेश करायला पाहिजे तसेच डोळ्याखालील डार्क सर्कल दूर करण्यासाठी बटाटे हा फार चांगला उपाय मानला जातो. बटाटा या घटकामध्ये बी जीवनसत्वे असतात. रात्री झोपण्यापूर्वी चेहरा स्वच्छ धुवा. त्यानंतर बटाट्याचे काप करुन ते डोळ्यांवर कमीत कमी अर्धा तास ठेवा . त्यानंतर पुन्हा चेहरा पाण्याने धुवा.

गुलाब जल-
अनेक वेळा ऐकले असेल कि , गुलाब पाणी याचा वापर चेहरा क्लीन करण्यासाठी आणि त्वचेला मुलायम बनवण्यासाठी वापर केला जातो. गुलाब जलच्या मदतीनेही डार्क सर्कल दूर केले जाऊ शकतात. डोळे बंद करुन गुलाब जलने भिजवलेला कापसाचा बोळा डोळ्यांवर ठेवा.हे दिवसातून एकदा झोपताना १ ० मिनिटांसाठी करा असे केल्याने डोळ्यांजवळील त्वचा चमकदार होइल.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7875002893 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

Leave a Comment