हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Investment Tips : आता 2023 हे नवीन वर्ष सुरू झाले आहे. अशातच मागील वर्षाच्या तुलनेत हे वर्ष चांगले असेल, अशी अपेक्षा देशातील अनेक गुंतवणूकदार बाळगून आहे. आज आपण तज्ञांच्या हवाल्याने चांगला नफा देणाऱ्या काही गुंतवणूकीच्या पर्यायांबाबत जाणून घेउयात….
आज आपण ज्या गुंतवणूकीच्या ज्या पर्यायांबाबत चर्चा करणार आहोत, त्यामध्ये इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS), युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP) आणि सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF) यांचा समावेश आहे. फिंटोचे संस्थापक मनीष पी. हिंगर यांनी या तिन्ही पर्यायांबाबत एक खास योजना आखली केली आहे. ज्याद्वारे यामध्ये गुंतवणूक करून आयकर कायद्याच्या कलम 80C अंतर्गत कर सवलत मिळवता येऊ शकेल. Investment Tips
युनिट लिंक्ड इन्शुरन्स प्लॅन (ULIP)
हे लक्षात घ्या कि, ULIP चा लॉक-इन पिरियड 5 वर्षांचा असेल. तसेच याच्या व्यवस्थापनावर आपल्याला म्युच्युअल फंडांपेक्षा जास्त खर्च करावा लागेल. ULIP मध्ये रिस्क कव्हर आहे कारण ते इनबिल्ट इन्शुरन्स प्लॅन सहीत येतात. यामध्ये मॅच्युरिटी आधीच जर खातेदाराचा मृत्यू झाला तर त्याच्या कुटुंबाला इन्शुरन्सची रक्कम मिळेल. तसेच यामध्ये रिटर्नची कोणतीही गॅरेंटी नसते. याच बरोबर यामध्ये एका वर्षामध्ये एकूण 2.5 लाख रुपयांपर्यंतची गुंतवणूक केल्यास, मॅच्युरिटीवर मिळालेल्या रकमेवर कोणताही टॅक्स द्यावा लागणार नाही. मात्र याच्या वर गेल्यास टॅक्स द्यावं लागेल. Investment Tips
सार्वजनिक भविष्य निर्वाह निधी (PPF)
PPF चा लॉक-इन पिरियड 15 वर्षांचा असेल. तसेच PPF मधील खर्चाबद्दल बोलायचे झाल्यास, गुंतवणूकदाराला 100 रुपये फक्त एकदाच भरावे लागतात. यामध्ये कोणताही रिस्क कव्हर उपलब्ध नाही. पूर्णपणे टॅक्स फ्री असलेल्या या योजनेवर सध्या 7.1 टक्के दराने व्याज उपलब्ध आहे. Investment Tips
इक्विटी लिंक्ड सेव्हिंग स्कीम (ELSS)
ELSS मध्ये सर्वात कमी लॉक-इन पिरियड आहे. तसेच SEBI ने त्याच्या खर्चाच्या गुणोत्तरावर मर्यादा घातली आहे, ज्यामुळे येथे कमी खर्चात चांगले प्रोफेशनल मॅनेजमेंट उपलब्ध आहे. मात्र यामध्ये रिटर्न मिळण्याची शाश्वती नाही. त्याचा 3 वर्षांचा सरासरी रिटर्न 17.19 टक्के आहे. तसेच लॉक-इन पिरियड नंतर, त्यामधून मिळालेल्या नफ्यावर 10% पर्यंत टॅक्स द्यावा लागेल. मात्र, जर नफा एक लाख रुपयांपर्यंत असेल तर मात्र कोणताही टॅक्स भरावा लागणार नाही.
अधिक माहितीसाठी ‘या’ वेबसाईटला भेट द्या : http://www.nsiindia.gov.in/InternalPage.aspx?Id_Pk=55
हे पण वाचा :
अर्जेंटिनाचा स्टार फुटबॉलपटू Lionel Messi ची एकूण संपत्ती किती ??? त्याविषयीची माहिती जाणून घ्या
FD Rates : ‘या’ बँकेच्या FD वर मिळेल 8.80% पर्यंत व्याज, इतर बँकांचे व्याजदर तपासा
Gold Price : सोने महागले तर चांदी झाली स्वस्त, जाणून घ्या सराफा बाजाराची आठवडाभराची स्थिती
Recharge Plan : फक्त 225 रुपयांमध्ये ‘ही’ कंपनी देत आहे अनलिमिटेड व्हॅलिडिटी
PM Kisan Yojana : शेतकऱ्यांना मिळणार नवीन वर्षाची भेट, खात्यामध्ये पाठवले जाणार इतके रुपये