…अन् तिला वाचवण्यासाठी सख्ख्या भावांनी लावली जीवाची बाजी; तिघांचाही पाण्यात बु़डून मृत्यू

0
49
River Death
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सोलापूर : हॅलो महाराष्ट्र – सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील एका दर्गा परिसरातील तलावात तीन जणांचा बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. हे तिघेजण एकाच गावातील रहिवासी असल्यानं गावात शोककळा पसरली आहे. मृत तिघेजण आपल्या नातेवाईकांसोबत बोरामणी येथील दावल मलिक दर्गा या ठिकाणी गेले होते. या दरम्यान दर्गा परिसरातील एका तलावात तिघांचा बुडून मृत्यू झाला आहे. तिघांचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानं परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

मृत झालेल्या तिघांची नावं रिहाना तौफिक पिरजादे,यासिन हारुण शेख आणि सलीम हारुण शेख अशी आहेत. हे तिघेही विडी घरकुल कुंभारी या ठिकाणचे रहिवाशी आहे. मृत व्यक्तींमध्ये दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. पाण्याचा अंदाज न आल्याने हि घटना घडली आहे. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. हे तिघेजण आपापल्या नातेवाईकांसोबत सोलापूर जिल्ह्यातील बोरामणी येथील दावल मलिक दर्ग्यात आले होते.

या ठिकाणी त्यांनी सर्व धार्मिक विधी उरकल्यानंतर, घरी परत जात असताना, तिघेही दर्गा परिसरातील वन विभागाच्या क्षेत्रात असणाऱ्या तलावाजवळ आले. यावेळी रिहाना ही पाण्यात उतरली. पण पाण्याचा अंदाज न आल्यानं ती तलावात बुडू लागली. गावातील एक महिला पाण्यात बुडत असल्याचं दोघा भावंडांना दिसलं. यानंतर दोघे सख्खे भाऊ रिहाना यांना वाचवण्यासाठी तलावात उतरले. त्यांनी आपला जीव धोक्यात घालून रिहाना यांना वाचवण्याचा प्रयत्न केला. पण दुर्दैवानं या तिघांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. एकाच गावातील तिघांचा अशा पद्धतीनं अंत झाल्यानं गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here