जिल्ह्यातील ग्रामीण भागातील शाळा सुरू करण्याचा आज निर्णय

औरंगाबाद – जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाने पहिली ते बारावीचे वर्ग सुरू करण्यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाकडे परवानगी मागितली आहे. त्यावर जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली आज होणाऱ्या जिल्हा आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकीत तास फोर्स निर्णय घेईल, असे शिक्षणाधिकारी एम.के. देशमुख यांनी सांगितले.

जिल्ह्यातील 4 हजार 602 शाळा महाविद्यालयात पहिली ते बारावीच्या वर्ग चालवले जातात. त्यापैकी 3 हजार 629 शाळा ग्रामीण भागात आहेत. ग्रामीण भागातील 1347 गावांपैकी 169 गावांमध्ये सध्या कोरोनाचे रुग्ण आहेत. त्यापैकी औरंगाबाद, गंगापूर तालुक्यात शहरालगतच्या गावात कोरूना संक्रमण अधिक असून 1127 गावे वाडी-वस्तीवर कोरोनाचा शिरकाव झालेला नाही. आज टास्क फोर्स यावर काय निर्णय घेतो याकडे विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांचे लक्ष लागले आहे.

शहरातील वर्ग आजपासून सुरू –
लसीचा किमान एक डोस घेतलेल्या दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी शहरातील शाळांमध्ये प्रत्यक्ष वर्ग आजपासून बनवण्यासाठी मनपा प्रशासकांनी परवानगी दिली आहे. तोरणाच्या मार्गदर्शक सूचनांची अंमलबजावणी शाळांनी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.