हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । Tollywood : एसएस राजामौली हे नाव माहिती नसेल असा एकही व्यक्ती भारतात सापडणार नाही. राजामौली हे भारतीय फिल्म इंडस्ट्रीमधील उत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहेत. राजामौली यांनी ‘RRR’ आणि ‘बाहुबली’ सारखे ब्लॉकबस्टर चित्रपट दिग्दर्शित केले आहेत. राजामौली यांच्या मेहनतीमुळे या चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळवले आहे.
1000 कोटींच्या क्लबमध्ये समावेश झालेला ‘RRR’ हा राजामौली यांचा हा दुसरा पॅन इंडिया चित्रपट आहे. यापूर्वी त्यांच्या ‘बाहुबली 2’ या चित्रपटाने 1700 कोटींची कमाई केली होती. राजामौलींच्या चित्रपटांशी निगडित काही समजही आहेत. त्यांच्या चित्रपटात काम करणारे कलाकार देशभरात रातोरात प्रसिद्ध होतात. मात्र असे मानले जाते कि त्यानंतर येणारे या कलाकारांचे चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप होतात.
राजामौलीशी संबंधित या समजेचे सर्वात ज्वलंत उदाहरण म्हणजे सुपरस्टार प्रभास आणि राम चरण. 2015 मध्ये ‘बाहुबली’ चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रभास रातोरात संपूर्ण भारताचा सुपरस्टार बनला. त्याच्या बाहुबली या नावापुढे बॉलीवूडचे अनेक स्टार्स छोटे वाटू लागले. यानंतर 2017 मध्ये आलेल्या ‘बाहुबली 2’ ने तर त्याचे स्टारडम आणखी उंचीवर नेले. मात्र याच्या अवघ्या दोनच वर्षांनी प्रदर्शित झालेला ‘साहो’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सपशेल आपटला. जसे तसे करून या चित्रपटाला आपला खर्च वसूल करता आला आहे. Tollywood
‘साहो’ चित्रपटाचे बजट 350 कोटी रुपये होते तर कमाई फक्त 450 कोटी रुपयेच होऊ शकली. नुकताच प्रभासचा ‘राधे श्याम’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाकडूनही लोकांना मोठ्या अपेक्षा होत्या. त्याचे बजटही 350 कोटी रुपये होते. टीझर आणि ट्रेलरमध्ये ज्या प्रकारे झलक पाहायला मिळाली, त्यावरून हाही चित्रपट ‘बाहुबली’सारखाच मोठा असेल असे वाटले होते, मात्र रिलीजनंतर पितळ उघडे पडले. हा चित्रपटही ‘साहो’ सारखाच निघाला. त्याचा खर्चही वसूल होऊ शकला नाही. या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 150 कोटी आहे, जे त्याच्या बजटच्या निम्मे आहे. अशाप्रकारे राजामौलीच्या चित्रपटानंतर प्रभास फ्लॉप ठरला. Tollywood
असाच काहीसा फटका साऊथ सिनेसृष्टीतील दुसरा सुपरस्टार रामचरणलाही बसला आहे. ‘RRR’ नंतर त्याचा ‘आचार्य’ हा तेलुगू चित्रपट प्रदर्शित झाला. 140 कोटींचे बजट असलेल्या या चित्रपटाला आपला खर्च भागवण्यासाठीही धडपड करावी लागत आहे. या चित्रपटाची एक खास गोष्ट अशी कि, यामध्ये राम चरणचे वडील मेगास्टार चिरंजीवीही आहेत. यानंतरही या चित्रपटाने आतापर्यंत फक्त 100 कोटींची कमाई केली आहे. Tollywood
आता इथे एक प्रश्न असा पडतो की असे का घडते? राजामौलींचे चित्रपट केल्यानंतर रातोरात संपूर्ण देशात प्रसिद्ध झालेल्या या कलाकारांचे इतर चित्रपट का फ्लॉप होतात ? याचे उत्तर स्वतः राजामौली यांनी दिले आहे. आपल्या चित्रपटांद्वारे भारतीय चित्रपटाची दशा आणि दिशा बदलणारे राजामौली हे गॅरेंटेड हिट चित्रपट देण्यासाठी ओळखले जातात. राजामौली हे एक असे दिग्दर्शक आहेत ज्यांच्या चित्रपटात काम करणारा कोणताही कलाकार रातोरात सुपरस्टारच्या खुर्चीत बसतो. Tollywood
राजामौली यांची विचारसरणी, सर्जनशीलता, मेहनत करण्याची क्षमता, कल्पनाशक्ती, भव्य चित्रपट निर्माण करण्याची कला, कोणत्याही कलाकाराकडून 100 टक्के काम करून घेण्याची हातोटी त्यांना देशातील इतर दिग्दर्शकांपेक्षा वेगळे करते. चित्रपट बनवण्यासाठी तो आध्यात्मिक साधना करतात. जेव्हा ‘बाहुबली’ चित्रपटाची निर्मिती होत होती, त्यावेळी त्यांनी स्वतःला आणि चित्रपटाच्या संपूर्ण टीमला पाच वर्षे कैदच केले होते. या चित्रपटांसाठी त्यांनी सुमारे 380 दिवस सलग शूटिंग केले, जे हॉलीवूडचा कोणताही मोठा चित्रपट बनवण्यासाठी लागणाऱ्या दिवसांच्या दुप्पट आहे. Tollywood
आपल्या चित्रपटासाठी इतके समर्पण भारतीय चित्रपटसृष्टीत काम करणाऱ्या इतर कोणत्याही दिग्दर्शकामध्ये दिसून आले नाही. यामुळेच राजामौली यांचे चित्रपट इतिहास घडवतात. आता दुसरे सर्वात मोठे कारण म्हणजे अशा चित्रपटांमध्ये काम केल्यानंतर अशा कलाकारांकडून लोकांच्या अपेक्षा वाढतात. प्रेक्षकांच्या नजरेत त्यांची एक प्रतिमा तयार होते, ज्यातून ते त्या अभिनेत्याला वेगळे पाहू इच्छित नाही. बाहुबलीमध्ये बाण आणि तलवारी चालवणारा प्रभास जेव्हा साहोमध्ये बंदूक चालवतो तेव्हा लोकांना ते आवडत नाही. त्याची जुनी झलक आता त्याच्या आगामी ‘आदिपुरुष’ या चित्रपटात पाहायला मिळू शकेल. Tollywood
हे पण वाचा :
JioPOS Lite App : Jio Recharge द्वारे घर बसल्या पैसे कमावण्याची संधी !!!
Mukesh Ambani च नाही तर त्यांचे शेजारीही आहेत अब्जाधीश, त्यांच्या शेजारी कोण-कोण राहतात ते पहा
Nexon EV Max : एका चार्जमध्ये 437 किमी धावणार Tata ची ‘ही’ गाडी, किंमत किती असेल ते पहा
Home Loan Rate Hike: होम लोन महागल्यानंतर जाणून घ्या आपल्याकडे कोणकोणते पर्याय असतील ???
e-shram card : खुशखबर !!! आता ई-श्रम कार्डधारकांना घर बसल्या मिळणार ‘हे’ फायदे