ठाकरे गटाच्या पक्ष आणि चिन्हाच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात उद्या सुनावणी

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । निवडणूक आयोगाविरोधात दाखल करण्यात आलेल्या ठाकरे गटाच्या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे. तातडीने सुनावणी घ्या, अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी ठाकरे गटाकडून केली होती. आता निवडणूक आयोगाच्या सुनावणीवर उद्या दुपारी 3.30 वाजता वेगळ्या बेंचसमोर सुनावणी घेण्यात येईल असे कोर्टाकडून सांगण्यात आले आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने पक्ष आणि चिन्हाबाबत दिलेल्या निर्णयाबाबत ठाकरे गटानं दाखल केलेल्या याचिकेवर कोर्ट उद्या दुपारी साडेतीन वाजता सुनावणी घेण्यात येईल असे सांगितले आहे. त्यामुळे आता उद्या दुपारी 3.30 वाजता घटनापीठ यावर निर्णय घदेण्यात येणार आहे.

सुप्रीम कोर्टात पाच न्यायमूर्तींच्या घटनापीठासमोर ठाकरेंच्या याचिकेची सुनावणी घेण्यात येणार आहे. ठाकरेंनी दाखल केलेल्या याचिकेवर सुप्रीम कोर्टाने म्हंटले आहे की, याचिका आम्ही पूर्णपणे वाचलेली नाही, त्यामुळे उद्या दुपारी या संदर्भात सुनावणी घेण्यात येईल.

सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयावर शिंदे गटाची वकिल कौल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले की, ठाकरे गटाने सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नाही. यापूर्वी देखील ठाकरे गट दिल्ली उच्च न्यायालयात दाद मागितली आहे. मात्र, दोनदा हायकोर्टाने नकार दिला आहे. त्यावर आत्ता या प्रकरणवर चर्चा नको, उद्या दुपारी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकले जाईल, असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे.