गुलाबी थंडीत हनिमूनला जाताय? महाराष्ट्रातील या TOP 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या

TOP 5 best tourist and honeymoon places
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या हिवाळ्याचा महिना असल्यानं गुलाबी थंडीत फिरण्याची मजा काही औरच असते. मग अशा दिवसात कुणी मित्रमैत्रिणी एखाद्या पर्यटनस्थळी तर लग्न झालेले नवीन जोडपे हनिमून साजरा करण्यासाठी एखाद्या सुन्दर अशा ठिकाणी जाण्याचा प्लॅन करत असतील तर महाराष्ट्रातील सुंदर या TOP 5 ठिकाणांना नक्कीच भेट द्या. या ठिकाणी नमसोक्तपणे तुम्ही एन्जॉय करू शकता.

Lonavala

1. लोणावळा (Lonavala)

अतिशय निसर्गरम्य असलेले लोणावळा हे पर्यटन स्थळ मुंबईच्या जवळ आहे. या ठिकाणी डोंगर, दऱ्या, धबधबे, आणि महत्त्वाचे म्हणजे लोणावळा चिक्की ही अतिशय लोकप्रिय आहे. लोणावळ्यामध्ये घनदाट जंगले, लेण्या आणि निसर्गरम्य धबधबे आहेत. लोणावळ्याच्या आजूबाजूला असणारे गड किल्ले व लेण्या येथील इतिहास व प्राचीनतेची साक्ष देतात. लोणावळ्यातील टायगर पॉइंट किंवा टायगर लीप हे ६५० मीटर डोंगर शिखरावर वसलेले, हिरवीगार दरी, तलाव आणि धबधब्यांच्या विहंगम दृश्याचा नजराणा लाभलेले ठिकाण.

लोणावळ्यातील सर्वोत्तम ठिकाणांपैकी एक म्हणजे ड्यूक्स नोज. ड्यूक्स नोज पॉइंटवरून खंडाळा घाटाचा काळजाचा ठेका चुकवणारा नजारा पाहायला मिळतो. ड्यूक ऑफ वेलिंग्टनच्या नावावरून या जागेचे नाव पडले आहे. राजमाजी किल्ला हा लोणावळ्यात पर्यटकांचे सर्वोच्च पसंतीचे ठिकाण मानले जाते. हा किल्ला समुद्र सपाटीपासून 2,710 फूट उंचीवर असून इथून सह्याद्री पर्वत तसेच शिरोटा धरण खाडीचा नयनरम्य नजारा दिसतो.

Kolad

2. कोलाड (Kolad)

कोलाड हे महाराष्ट्रमधील सर्वात महत्त्वाच्या ठिकाणांपैकी एक आहे. कोलाड हे पर्यटन स्थळ व्हाईट रिव्हर राफ्टिंगसाठी प्रसिद्ध आहे. यासोबतच येथे हिरवीगार जमीन, मोठी मोठी मैदाने, रॅपलिंग यांसारख्या जागा उपलब्ध आहेत. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये कोलाडचे सौंदर्य आणखीनच उभारून येते. त्याचबरोबर कोलाड येथे मोठमोठे धबधबे, डोंगरे, धरणे अशा विविध निसर्ग सौंदर्याने नटलेले हे ठिकाण आहे.

kolad 03

मुंबईपासून ११० किमी अंतरावर कोलाड हे महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यात आहे. कोलाडमधील काही उत्कृष्ट आकर्षणांमध्ये कुंडलिका नदीचा समावेश आहे, जो प्रदेशातील स्वच्छ पाण्याच्या राफ्टिंगचे केंद्र आहे. वॉटर स्पोर्ट्स जसे की व्हाइट वॉटर राफ्टिंग आणि बोटिंग टू हायकिंग, कॅम्पिंग, नेचर वॉक आणि ट्रेकिंग यासारख्या एडव्हेंचरस एक्टिव्हीटीमुळे हे परफेक्ट हनिमून व सुट्टीचे ठिकाण आहे.

अलिबाग

3. अलिबाग (Alibaug)

अलिबाग हे पर्यटन स्थळ त्याच्या मोठ्या समुद्रांसाठी ओळखले जाते. त्याचबरोबर इथे सुंदर दृश्य, वीला यांसारख्या गोष्टी आहेत. अलिबाग हे मुंबई पुण्यापासून जवळ असणारे शहर आहे. मुंबईमधील पर्यटकांना येथे पोहोचण्यासाठी सागरीमार्ग हा चांगला पर्याय आहे. त्यामुळे रस्त्यावरील चार तासांचा प्रवास टाळून पर्यटक बोटीनेच येथे येण्याला सर्वाधिक पसंती देतात. त्याचबरोबर तुम्ही तुमच्या पार्टनरला घेऊन अलिबाग येथे येऊ शकता. त्याचबरोबर अलिबाग येथे कुलाबा किल्ला आहे. अलिबागला मिनी गोवा म्हणून ओळखले जाते.

Ratnagiri

4. रत्नागिरी (Ratnagiri)

रत्नागिरी हे शहर त्यांच्या मोठमोठ्या डोंगरांसाठी प्रसिद्ध आहे. विस्तीर्ण समुद्रकिनारा, डोंगरदऱ्या यांनी वेढलेली रत्नागिरी हे हनिमूनसाठी एक चांगले ठिकाण आहे. तुम्ही हनीमूनसाठी बेस्ट डेस्टिनेशन म्हणून रत्नागिरी हे शहर निवडू शकता. त्याचबरोबर रत्नागिरी येथे मोठमोठे हॉटेल उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्ही फिरता फिरता स्वादिष्ट व्यंजनांचा देखील आस्वाद घेऊ शकता. रत्नागिरी शहरातल्या सुप्रसिद्ध मधल्या आळीत लोकमान्य टिळक जन्मभूमीचं जतन केलं असून अनेक टिळकप्रेमी इथे येऊन हे ठिकाण पाहून जातात. मांडवी बंदर, भाट्ये समुद्रकिनारा, मत्स्यालय, थिबा राजवाडा, भैरी मंदिर, भागेश्वर मंदिर, पतितपावन मंदिर अशी अनेक प्रेक्षणीय स्थळं या ठिकाणी आहेत.

Aurangabad

5. औरंगाबाद Aurangabad

औरंगाबाद हे पर्यटन स्थळ महाराष्ट्राच्या सांस्कृतिक केंद्रासाठी ओळखले जाते. अशातच औरंगाबाद येथील रेशमी आणि सुती कपड्यांची चर्चा पूर्ण जगभर पसरलेली आहे. त्याचबरोबर औरंगाबाद जवळ अजिंठा आणि एलोरा या गुफा आहेत. तुम्ही तुमचा ओकेशन प्लॅन करण्यासाठी औरंगाबाद हे शहर निवडू शकता. औरंगाबाद येथे अनेक पर्यटक वेगवेगळ्या शहरांमधून भेट द्यायला येतात. त्याचबरोबर औरंगाबाद येथे बीबी का मकबरा आहे. हा बीबी का मकबरा हुबेहूब ताजमहाल सारखा दिसतो. औरंगाबाद येथे हिमायत बाग, सलीम अली झील पाहण्यासाठी लोक येतात.