हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या गुलाबी थंडी सर्वत्र पडत असून या फेब्रुवारी महिन्यात अनेकजण पर्यटनाचा आनंद लुटत आहेत. नुकतीच या महिन्याला असुरुवात झाली असून या महिन्याच्या सुरुवातीलाच व्हॅलेंटाईन वीक असल्याने रोमान्ससाठी हा महिना खूप खास मानला जातो. या काळात अनेक प्रेमी युगुल तसेच नवविवाहित जोडपे एकमेकांसोबत एकत्रित महत्वाचे क्षण घालवतात. तुम्हालाही तुमच्या जोडीदारासोबत असे क्षण घालवायचे असतील तर आम्ही तुम्हाला काही खास अशा टॉप पर्यटनस्थळांविषयी सांगणार आहोत. कि ती खूपच खास आहेत. चला तर मग जाणून घेऊया त्या ठिकाणांबद्दल…
1) लोणावळा (Lonavala)
तुम्ही व्हॅलेंटाईन डे निमित्त रोमॅंटिक डेस्टिनेशनच्या शोधात असाल तर तुम्ही लोणावळ्याला भेट देऊ शकता. हे पुण्यापासून आणि मुंबईपासूनही जवळ आहे. सोबतच थंडगार वारा आणि मनाला भावणारी हिरवळ तुमच्या मनात घर करेल. व्हॅंलेंटाईन डे साठी हे परफेक्ट डेस्टिनेशन ठरू शकतं. लोणावळा हे भारतातील राज्य महाराष्ट्रातल्या पुणे जिल्ह्यामध्ये असलेले एक पर्यटनस्थळ आहे. लोणावळा पुण्यापासून रस्त्याने ६४ किमी तसेच मुंबईपासून ९६ किमी अंतरावर आहे. लोणावळा चिक्की हा एक चवीने आंबट गोड असलेला सुप्रसिद्ध पदार्थ आहे. लोणावळा हे मुंबई व पुण्यामधील एक अतिमहत्त्वाचे रेल्वे स्टेशन आहे. मुंबई – पुणे एक्सप्रेस हायवे आणि मुंबई – चेन्नई हायवे लोणावळा शहरातून जातो.
लोणावळा आसपासची पर्यटनस्थळे
खंडाळा : हे एक प्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण आहे. येथून मुंबई दिशेला जाणाऱ्या बोरघाटाची उतरण सुरू होते.
राजमाची पॉईंट : राजमाची पॉईंट लोणावळ्यापासून ६.५ किमी अंतरावर आहे. येथून शिवाजी महाराजांचा राजमाची किल्ला तसेच आजूबाजूच्या परिसराचे विहंगम दृश्य बघता येते.
टायगर पॉईंट : टायगर पॉईंट हा एक उंचावरील कडा आहे. जेथे सरळ उभी अशी ६५० मीटरची खोल दरी आहे.
कार्ला लेणी : लोणावळ्याजवळच्या मळवली येथे असलेल्या कार्ला लेण्यांची निर्मिती बुद्ध भिक्षूंनी ख्रिस्तपूर्व २ ऱ्या आणि ३ ऱ्या शतकात केली. येथे एकवीरा देवीचे प्रसिद्ध मंदिर आहे.
लोहगड किल्ला : मळवली रेल्वे स्थानकापासून ११.२ किमी लांबीच्या चढाईच्या रस्त्याने, एकेकाळी शिवाजी महाराजांचा लष्करी तळ असलेल्या या लोहगड किल्ल्याला पोहोचता येते. लोहगडसमोरच विसापूरचा किल्ला आहे.
भुशी धरण : लोणावळा आणि आयएनएस शिवाजीमध्ये असलेल्या धरणाजवळील हा धबधबा प्रसिद्ध आहे. येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचे रेल्वे टर्मिनस उभारले जाणार आहे जेणेकरून लोणावळा रेल्वे स्थानकावरील ताण कमी होईल व पुणे उपनगरी रेल्वेसाठी विशेष टर्मिनस मिळेल.
2) लवासा (Lavasa)
लवासा हे प्रयत्न स्थळ पुण्यापासून ५७ किलोमीटर अंतरावर आहे. निसर्ग आणि प्रेम यांचं अतुट नातं या याठिकाणी आल्यावर पहायला मिळतं. तुम्हाला शांत आणि प्रसन्न अशा वातावरणात तुमच्या जोडीदारासोबत वेळ घालवायचा असेल तर तुम्ही पुण्याहून लवासाला जाऊ शकता. तुम्ही इथे जातानाच या ठिकाणाच्या प्रेमात पडाल. पार्टनरला फिरायला घेऊन जाण्यासाठी हे परफेक्ट डेस्टिनेशन म्हणतात येईल.
देवकुंड धबधबा लवासातील सर्वात भव्य प्रेक्षणीय स्थळांपैकी एक आहे. हे एक राखलेले रहस्य आहे जे प्रवाशांना आश्चर्यकारकपणे ताजेपणाचा अनुभव प्रदान करते. २२० फूट उंच धबधबा प्रवाशांचा थकवा दूर करण्यात आणि मेंदूला तजेला देण्यात कधीही अपयशी ठरत नाही. ट्रेकिंग, कॅम्पिंग आणि इतर साहसी खेळांसारख्या विविध साहसी क्रिया प्रकारामध्ये सहभागी होण्यासाठी हे एक उत्कृष्ट स्थान आहे. लवासापासून सुमारे ८० किमी अंतरावर हे ठिकाण आहे.
3) गोकर्ण (Gokarna)
गोवा अतिशय सुंदर आहे, यात शंका नाही. गोव्यासारख्या काही अप्रतिम बीच डेस्टिनेशनला जायचे असेल तर गोकर्णाहून चांगले ठिकाण नाही. गोकर्णमध्ये असे अनेक समुद्रकिनारे आणि ठिकाणे आहेत, जिथे तुम्हाला मजा येईल. अतिशय शांत, निवांत असलेले गोकर्ण हे शहर कर्नाटक-गोवा सीमारेषेनजिक आहे. गोव्याहून अगदी जवळ असलेल्या या शहरात रमणीय समुद्रकिनारे, महादेवाचं महाबळेश्वर मंदिर, टेकड्या आणि पश्चिम घाटाची विहंगम दृश्यं पाहण्याची संधी मिळू शकेल. आणि निसर्गसौंदर्याचं मुक्त वरदान लाभलेल्या गोकर्णला भेट द्यायला हवी.या ठिकाणी योग केंद्र, ओम बीच, पॅराडाइज बीच, मिर्जन किल्ला आदी प्रेक्षणीय स्थळे आहेत.
मुख्य शहरापासून अवघ्या 7.6 किमी अंतरावर असलेला हा समुद्रकिनारा अप्रतिम जलक्रीडा आणि प्रसन्न वातावरण प्रदान करतो. ज्याचा कोणालाही आनंद घ्यायला आवडेल. संपूर्ण समुद्रकिनारा पांढरा आहे वाळू, ते पाहण्यासारखे दृश्य बनवते. या ठिकाणी आल्यावर तुम्हालाही जोडीदारासोबत समुद्रकिनाऱ्यावर थंड पाण्यात पोहण्याचा आनंद घेता येईल.
4) महाबळेश्वर (Mahabaleshwar)
महाराष्ट्राची राजधानी मुंबईपासून अवघ्या 263 किलोमीटर अंतरावर असलेल्या महाबळेश्वरची गणना देशातील सुंदर हिल स्टेशनमध्ये केली जाते. आपल्या जोडीदारासह पावसाचा आनंद घेण्यासाठी फेब्रुवारीमध्ये महाबळेश्वरला जाणे एक उत्तम आयडिया आहे. तुम्ही तुमच्या पार्टनरसोबत येथील रोमॅंटिक वातावरणात बराचवेळ एकत्र घालवू शकता. महाबळेश्वर हे नैसर्गिक साधन संपत्तीने परिपूर्ण आहे, येथे घनदाट जंगले, उंच डोंगर, खोल दऱ्या, हिरवेगार भूप्रदेश, वाहणारे धबधबे आणि आणि मंडळे आपल्याला लक्षात ठेवण्यासाठी संस्मरणीय ठिकाणे देईल. महाबळेश्वरमधील सर्वात प्रसिद्ध पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे वेण्णा लेकला जाण्यास विसरू नका. १९४२ मध्ये शिवाजी महाराजांचे वंशज श्री आप्पासाहेब महाराज यांनी मानवनिर्मित तलाव बनविला होता. हा तलाव एक महाबळेश्वरमधील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असून त्याच्या किना-यावर प्रतापसिंह उद्यान आहे.
5) मालवण (Malvan)
फेब्रुवारी महिना सुरु झाल्यावर खरंतर प्रेमाचे वारे जास्त वाहू लागतात. केवळ माणसांमध्येच नाही तर अगदी निसर्गही खूप रम्य असतो यावेळी हलकीशी थंडी आणि थोडीसं दमट असं काहीसं वातावरण असतं आणि या निसर्गाच्या सान्निध्यात आपल्या प्रेमाच्या माणसाबरोबर दिवस आणि रात्र घालवणं म्हणजे सर्वात मोठा आनंद. तुमच्यासाठी महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण हे अतिशय नयनरम्य ठिकाण आहे. तुम्हाला चांगल्या वातावरणात तुमच्या जोडीदाराबरोबर फिरण्याची इच्छा असेल तर मालवण हा उत्कृष्ट पर्याय आहे. शिवाय मालवणमध्ये आता वॉटर स्पोर्ट्सदेखील चालू करण्यात आले आहेत. त्यामुळे तुम्हाला जर व्हॅलेंटाईनच्या वेळी आपल्या जोडीदाराबरोबर अॅडव्हेंचर ट्राय करायचे असतील तर मालवणला नक्की भेट द्यायला हवी.
6) माथेरान (Matheran)
मुंबईपासून अवघ्या दोन तासांवर असणारं माथेरान हे प्रत्येकासाठी खरं तर मनाजवळचं ठिकाण. माथेरानला व्हॅलेंटाईन डे च्या दिवशी तुम्ही नक्कीच जाऊ शकता. फेब्रुवारी महिन्यात इथे असणारी थंडी आणि तिथलं वातावरण हे तुम्हाला खूपच आनंद देते. त्याशिवाय इथली शांतता जोडप्यांना एकमेकांबरोबर वेळ घालवण्यासाठी अधिक फायदेशीर ठरते. माथेरानमधील वातावरण हे प्रेमासाठी नेहमीच उत्तम ठरतं. त्यामुळे तुम्ही व्हॅलेंटाईनसाठी नक्कीच माथेरान हा पर्यायही उत्तम आहे.