हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । मित्रानो, यंदाचा उन्हाळा आता संपत आला असून लवकरच महाराष्ट्रात मान्सून दाखल होणार आहे. कडक उन्हामुळे आधीच वैताग आल्याने पावसाळ्यात तरी कुठेतरी जाऊन निसर्गाचा मनसोक्त आनंद घ्यावा अशी अनेकांची इच्छा असते. त्यामुळे जून महिना आली कि सर्वजण पावसाची आतुरतेने वाट पाहत असतात. पावसाळ्यात फिरायची तर इच्छा असते आणि नेमकं कुठे जावं हा प्रश्न कायम असतो. त्यामुळे जर तुम्ही सुद्धा यंदाच्या पावसाळयात पर्यटनाचा विचार करत असाल तर आज आम्ही तुम्हाला महाराष्ट्रातील ५ पर्यटन स्थळांबद्दल सांगणार आहोत ज्याठिकाणी जाऊन तुम्ही निसर्गाचा मनसोक्त आस्वाद घेऊ शकता.
१) लोणावळा खंडाळा – Lonavala Khandala
मुंबई – पुणे महामार्गावर सह्याद्रीच्या घाटमाथ्यावर वसलेले हे ठिकाण पर्यटनासाठी चांगलंच प्रसिद्ध आहे. खास करून पावसाळयात याठिकाणी येऊन निसर्गाचा आनंद घेण्यात वेगळीच मजा आहे. लोणावळा खंडाळ्यातील हिरवळ, डोंगररांगा, दऱ्या आणि पावसाळयात डोंगरखोऱ्यातून वाहणारे नयनरम्य धबधबे अक्षरशः तुमचं मन जिंकून घेईल. विशेष म्हणजे पावसाळयाच्या दिवसात इथलेनिसर्गरम्य वातावरण आणखी बहरून जाते. याठिकाणी असलेली राजमाची टायगर लिप्स, राजमाची पॉईंट, वळवण धरण, भुशी धरण, कुणे धबधबा, कॅनियन व्हॅली या पर्यटन स्थळांना भेट देऊन तुम्ही मनसोक्त आनंद घेऊ शकता.
२) कोयना धरण : Koyna Dam
सातारा जिल्ह्यातील कोयनाधारण हे आकर्षक पर्यटन स्थळ आहे. महाराष्ट्र्रातील हे सर्वात मोठं धरण आहे. साताऱ्यापासून ९० किलोमीटर अंतर झालेल्या याठिकाणी जाणेही अतिशय सोपं आहे. कोयना धरणावर विविध सिंचन, विद्युत प्रकल्प बांधलेले आहेत. कोयना वन्यजीव अभयारण्य हे कोयना नदीकाठी एक निसर्गसंरक्षण आहे. पावसाळ्यात कोयना धरणाच्या सौंदर्यात भर घालणारे विविध पक्षी पर्यटकांच्या प्रमुख आकर्षण ठरते. दरवर्षी बाराही महिन्यात हजारो पर्यटक कोयना धरण परिसराला भेट देतात.
३) माळशेज घाट – Malshej Ghat
नगर- कल्याण रस्त्यावरील माळशेज घाट हा पावसाळयात मनसोक्त भिजण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण ठरेल. पावसाळ्यामध्ये माळशेज घाटातील दृष्य अगदी तुमच्या डोळ्याचे पारणे फेडेल. उत्तुंग कड्यांवर कोसळणारा मुसळधार पाऊस पाहायचा असेल तर माळशेज घाटात एक दिवस नक्कीच गेलं पाहिजे. माळशेज घाटातील धबधबे, फुललेल्या डोंगररांगा याची देही याची डोळा पाहण्यासाठी दरवर्षी पावसाळयात पर्यटक तुफान गर्दी करतात. या घाटातून दूरवर पसरलेल्या दऱ्यांना पाहणे म्हणजे एक वेगळीच मजा… माळशेज घाटात नक्की कस जायचे हे सुद्धा आज आम्ही तुम्हाला सांगतो. पुण्याहून नारायणगाव मार्गे माळशेज घाटात जाता येते, किंवा मुंबईहून-कल्याण-मुरबाड मार्गे जाता येते. तर विदर्भ मराठवाडा येथील पर्यटक राष्ट्रीय महामार्ग क्र.२२२ वरून माळशेज घाटात येऊ शकतात.
४) इगतपुरी- Igatpuri
नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी हे सुद्धा पावसाळ्यातील प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे. खास करून या परिसरात वाहणारे धबधबे पर्यटकांना चांगलंच आकर्षित करत असतात. याठिकाणी असलेलं भावली धरण,कॅमल व्हॅली, विहिगाव धबधबा, तसेच कुलंग, अलंग, मदनगड, कळसूबाई, रतनगड या उत्तुंग डोंगररांगा पाहून नक्कीच तुमचं मन मोहित होईल. याठिकाणी कस यायचं असा प्रश्न तुम्हला पडला असेल तर अजिबात चिंता करू नका. तुम्ही अगदी बसने सुद्धा इगतपुरीला सहज येऊ जाऊ शकता.
५) भंडारदरा -Bhandardara
अहमदनगर जिल्ह्यातील भंडारदरा हे पावसाळयात फिरण्याचे मस्त ठिकाण आहे. भंडारदरा हे प्रवरा नदीच्या काठी वसलेले गाव असून या ठिकाणाला निसर्गाचे मोठं वरदान लाभलं आहे. निसर्ग सौंदर्याने नटलेले हे ठिकाण इथले धबधबे, डोंगरकडे, जलाशय, हिरवी झाडे, यामुळे पर्यटकांचे मुख्य आकर्षण बनलं आहे. खास करून पावसाळ्यात तर याच्या सौंदर्यात आणखी भर पडते. भंडारदराची लोकप्रियता अतिशय वेगवान पद्धतीने होत असून दरवर्षी महाराष्ट्र्रातील कानाकोपऱ्यातून येथे भेट देणारांची संख्या वाढत आहे. पावसाळ्यात भंडारदरा इथे काजवा मोहत्सव सुद्धा भरतो.