व्हिसाशिवाय प्रवास करायचाय? या TOP 7 देशांना नक्कीच भेट द्या

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जेव्हा जेव्हा परदेशी प्रवासाची कल्पना मनात येते तेव्हा प्रथम चिंता व्हिसा बद्दल लागते. कारण व्हिसाशिवाय इतर देशात फिरता येणार नाही. मात्र, असे बरेच देश आहेत जेथे आपण व्हिसाशिवाय प्रवास करू शकता. जगात असे 16 देश आहेत, त्याठिकाणी पासपोर्टधारक भारतीयांना प्रवास करण्यासाठी व्हिसा लागत नाही. शिवाय त्यातील 7 महत्वाचे देश आहेत कि त्याठिकाणी आपल्याला सहजपणे व्हिसाशिवाय जाऊन मस्त एन्जॉय करता येऊ शकेल.

भारतीय लोक पर्यटनासाठी जास्तीत जास्त युरोपीयन देशांना पसंती देतात. मात्र, आपल्या शेजारी असणारा भूतान हा देशही पर्यटकांचे आवडते ठिकाण आहे. भूतानला भेट देण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही. येथे येण्यासाठी पासपोर्ट किंवा इतर कोणताही वैध आयडी पुरेसा आहे. देशात भूतान, नेपाळ आणि बारबारडोस, फिजी, जमैका, कजबस्तान, मॉरिशस  7 महत्वाचे देश आहेत कि त्या ठिकाणी तुम्ही विना व्हिसाचा पर्यटनाचा आनंद घेऊ शकता.

Bhutan

1) भूतान

भूतान हा भारताच्या उत्तर सीमेवरील एक छोटा भूपरिवेष्ठित देश आहे. भूतानच्या तीन दिशांना भारत देश तर चौथ्या दिशेस चीन देश आहे. भूतानच्या पूर्वेस अरुणाचल प्रदेश, पश्चिमेस सिक्कीम, दक्षिणेस पश्चिम बंगाल व उत्तरेस तिबेट आहे. थिंफू ही भूतानची राजधानी व सर्वात मोठे शहर आहे. २००६ साली प्रसिद्ध झालेल्या एका अहवालानुसार भूतान हा आर्थिकदृष्ट्या गरीब असला तरी तो आशियातील सर्वात आनंदी तर जगातील ८वा सर्वात आनंदी देश आहे. ७५ टक्के लोकसंख्या असलेल्या बौद्ध धर्माचे अनुयायी येथे बहुसंख्यक असून वज्रयान बौद्ध धर्म हा या देशाचा अधिकृत धर्म किंवा राष्ट्रीय धर्म आहे.

Nepal

2) नेपाळ

नेपाळ हा देश हिंदू राष्ट्र म्हणून ओळखला जातो नेपाळमध्ये 80 टक्के लोक हिंदू असून तेथील टक्केवारीच्या दृष्टीने जगातील सर्वाधिक हिंदू लोकसंख्येचा देश आहे. नेपाळची राजधानी काठमांडू ही आहे. तसेच येथील चलन हे नेपाळी रुपया आहे. या देशातील अधिकृत भाषा नेपाळी असून येथे नेवारी ही भाषा प्रचलित आहे. नेपाळ हा देश नैसर्गिक सौंदर्य सृष्टीने नटलेला आहे.

Barbados

3) बारबाडोस

बारबाडोस हा कॅरिबियन देशात वसलेला एक बेट आहे. या बेटावर फिरण्यासाठी किंवा राहण्यासाठी तुम्हाला कुठल्याही व्हिसाची गरज नाही. भारतीय या बेटावर व्हिसाशिवाय 90 दिवस फिरण्याचा आनंद घेऊ शकतात.

Moorish's

4) मॉरिशस

हे सुद्धा एक बेट आहे. सुंदर असे समुद्रकिनारे पर्यटकांना कायम आकर्षित करत असतात. तर दगडांच्या वैविध्यतेने हा देश नटलेला आहे. चहुबाजूंनी पाण्याने वेढलेल्या या बेटावर अनेक ठिकाणं बघण्यासारखी आहे.

फिजी

5) फिजी

रिपब्लिक ऑफ फिजी या अधिकृत नावाने ओळखला जाणारा फिजी हा एक देश आहे. दक्षिण प्रशांत महासागरात वसलेला ओशनिया खंडाच्या मेलनेशिया भागातील एक द्वीप-देश आहे. फिजी हा देश पॅसिफिक महासागराच्या 7056 स्क्वेअर मैल मध्ये पसरलेला आहे.

jamika

6) जमैका

जमैकाचे राष्ट्रकुल हा कॅरिबियनच्या ग्रेटर ॲंटिल्स भौगोलिक प्रदेशामधील एक लहान द्वीप देश आहे. जमैका कॅरिबियन समुद्रामध्ये क्युबाच्या १४५ किमी दक्षिणेस व हिस्पॅनियोलाच्या १८१ किमी पश्चिमेस वसला असून तो कॅरिबियनमधील पाचव्या क्रमांकाचा मोठा देश आहे. भारतीय व्हिसाशिवाय येथे तुम्ही 14 दिवस राहू शकतात. मॉरीशस हा देश नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. येथे भारतीय व्हिसाशिवाय जाऊ शकतात. भारतीय नागरिक येथे सुमारे 60 दिवस राहू शकतात. मकाउ हे कॅसिनो आणि हॉटेल्ससाठी प्रसिद्ध आहे. येथे जाण्यासाठी भारतीयांना व्हिसाची गरज नाही. भारतीय नागरिक येथे 30 दिवस इथे राहू शकतात.

Kazakhstan

7) कजाखस्तान

मध्य आशियातील पाच देशांमध्ये कझाखस्तानला विशेष महत्त्व आहे. क्षेत्रफळाच्या दृष्टीने प्रदेशातील सर्वात मोठा, नैसर्गिक संपत्तीने संपन्न, आर्थिकदृष्ट्या समृद्ध, शांतताप्रिय आणि विविधतापूर्ण असा हा देश. कझाखस्तानमध्ये विपुल नैसर्गिक संसाधने सापडतात; ज्यात ऊर्जा सुरक्षेसाठी महत्त्वाच्या खनिज तेल, नैसर्गिक वायू आणि युरेनियम यांचाही समावेश आहे. हा देश युरेनियमच्या उत्पादनात जगात पहिल्या क्रमांकावर आहे. पश्चिमेला कॅस्पियन समुद्र आहे, जो तेल व वायू साठे आणि संपर्कतेमुळे महत्त्वाचा आहे आणि दक्षिणेला अरल सागर आहे.

bhutan

करावी लागते फक्त एकच गोष्ट

जगातील सर्वात आनंदी देश म्हणून भूतानची ओळख आहे. भूतान हे त्याच्या नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध आहे. यासाठी तुम्हाला टूरिस्ट परमिट घेणे आवश्यक आहे. पारो, डोचुला पास, हा व्हॅली, पुनाखा जोंग, तक्षांग लखांग सारख्या अनेक अद्भुत ठिकाणांना तुम्ही भेट देऊ शकता.