व्हाट्सअप ग्रुप जॉईन करा
Take a fresh look at your lifestyle.

Satara News : कोयत्याचा धाक दाखवून 2 लाखांना लुटले; दुचाकीवरुन आले अन्…

कराड प्रतिनिधी । सकलेन मुलाणी

कराड तालुक्यातील तुळसण टात चोरट्यांकडून कोयत्याचा धाक दाखवून दरोडा टाकण्यात आल्याची घटना शुक्रवारी घेतली. रायटीच्यावेळी घाटातून निघालेल्या दोघा जणांना सहा दरोडेखोरांनी रोखत त्यांच्याकडून 2 लाख रुपयांची रोकड लुटल्याच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शुक्रवारी रात्री तुळसण येथील घाटातून दोघेजण दुचाकीवरून प्रवास करत होते. यावेळी घाटात अंधाराचा फायदा घेत मोटार सायकलीवरून सहा दरोडेखोर आले. त्यांनी संबंधितांना कोयत्याचा धाक दाखवला. तसेच त्याच्याकडे असणारी सुमारे दोन लाख रूपाची रोकड काढून घेतली.

दरम्यान, या दरोड्याची माहिती मिळताच कराड तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक आनंदराव खोबरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचारी दरोडेखोरांचा शोध घेत आहेत. शुक्रवारी रात्री घडलेल्या या दरोड्यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.