हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । सध्या पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे अनेक ग्राहकांचा कल हा इलेक्ट्रिक वाहनांकडे वळत आहे. ग्राहकांची वाढती मागणी पाहून अनेक वाहन निर्माता कंपन्यांनी गेल्या वर्षभरात अनेक गाड्या इलेक्ट्रिक व्हर्जन मध्ये बाजारात उतरवल्या आहेत. इलेक्ट्रिक गाड्या लोकांना परवडत असून त्यामुळे प्रदूषणही होत नाही. तसेच बाजारात सध्या इलेक्ट्रिक गाड्यांची मोठ्या प्रमाणात विक्रीही होत आहे. इलेक्ट्रिक गाड्यांच्या या मार्केटला सध्या सोन्याचे दिवस असतानाच आता जपानी ऑटोमोबाईल कंपनी टोयोटा अशा एका तंत्रज्ञानावर काम करत आहे ज्यामुळे येत्या काही काळात इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटला मोठा हादरा बसू शकतो. या इंजिनमुळे ऑटो इंडस्ट्रीत नवीन क्रांती होऊन इलेक्ट्रिक गाड्यांचे मार्केट बंद पडू शकतं असं बोललं जातंय.
टोयोटाने हायड्रोजन कम्बस्शन इंजिन विकसित केलं आहे. हायड्रोजन कम्बस्शन इंजिन हे गाडीला सर्वोत्तम इंजिन तर देत आहेच याशिवाय ते पर्यावरणासाठी सुद्धा चांगलंच लाभदायी आहे. हाईड्रोजन कम्बस्शन इंजिन प्रणाली ही अत्यंत उपयुक्त असल्याने आगामी काळात इलेक्ट्रिक गाड्यांच्या मार्केटपुढे तगडं आव्हान निर्माण होण्याची शक्यता आहे. वाहनाच्या प्रदूषणामुळे पर्यावरणाची समस्या आत्ताच भेडसावत आहे, आकडेवारी पाहिली तर 15 टक्के कार्बन उत्सर्जनासाठी रस्त्यांवरील वाहनेच जबाबदार आहेत. अशावेळी टोयोटाने विकसित केलेलं हायड्रोजन कम्बस्शन इंजिन जगाला नवी दिशा देईल. कारण यामुळे प्रदूषणाचा कोणताही धोका नाही.
जर आपण पर्यावरणाचा विचार केला तर टोयोटाचे हाईड्रोजन कम्बस्शन इंजिन इतर इंजिनांच्या तुलनेत अतिशय फायदेशीर आहे. हे इंजिन मुख्यतः हायड्रोजन वर चालत आहे जे आपल्या पर्यावरणात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. आणि याचे इंधनात रूपांतर करताना कोणतेही प्रदूषण होत नाही. हायड्रोजन हे एक्झॉस्ट फ्री आणि बिनविषारी असून त्याची साठवण आणि वाहतूकही खूप सोपी आहे.
दुसरा एक फायदा म्हणजे जेव्हा आपण इलेक्ट्रिक गाडी खरेदी करतो तेव्हा तिला सतत चार्जिंग करावं लागत, त्यामुळे लांब पल्ल्याच्या प्रवास करताना अडचणी निर्माण होऊ शकतात. परंतु हायड्रोजन इंजिनला इलेक्ट्रिक गाड्यांप्रमाणे सतत चार्ज करण्याची गरज नाही. हायड्रोजन इंजिनमध्ये ऊर्जा निर्माण करण्यासाठी फ्यूल सेल्सचा वापर केला जातो, ज्यामुळे हायड्रोजनचे इलेक्ट्रिसिटीमध्ये रूपांतर होते आणि ते वर्क होते. हायड्रोजन गाड्या या खर्च्याचा बाबतीत स्वस्त असतात, टेक्निकली सक्षम असतात त्यामुळे येत्या काही वर्षात इलेक्ट्रिक वाहन उद्योगासमोर मोठं आव्हान निर्माण करेल. एव्हढेच नव्हे तर टोयोटाचं नवीन इंजिन इलेक्ट्रिक गाड्यांचा धंदा बंद पडण्याचीही शक्यता आहे.