ट्रॅफिक कॅमेऱ्यांपासून वाचणे कठीण आहे ! जर ई-इनव्हॉईसबाबत शंका असेल तर काय करावे हे जाणून

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । दिल्ली, मुंबईसारख्या मोठ्या मेट्रो शहरात ट्रॅफिक सिग्नलवर संशयास्पद लोकं आणि रहदारीवर लक्ष ठेवण्यासाठी पोलिस कॅमेरे वापरतात. हे ट्रॅफिक कॅमेरे जास्त वेगाने जाणारी वाहने आणि नो पार्किंगमध्ये उभी असलेली वाहने यांचे ऑनलाईन चलन पाठविण्यात मदत करतात. तसं पहिला तर या कॅमेऱ्यांमध्ये काहीही गडबड नसते, परंतु काहीवेळा तांत्रिक बिघाडामुळे चुकीचे चलन देखील कापले जाते, म्हणून जर आपल्यालाही ट्रॅफिक कॅमेर्‍याद्वारे तयार करण्यात आलेल्या चलनाबद्दल शंका असेल तर आपण त्याविरुद्ध अपील करू शकता आणि त्यानंतर जोपर्यंत वाहतूक पोलिसांकडून वाहतूक उल्लंघन केल्याचा पुरावा मिळणार नाही तोपर्यंत तुम्हाला चलनाची भरपाई करावी लागणार नाही. चला तर मग त्याबद्दल सर्व काही जाणून घेऊयात …

ट्रॅफिक कॅमेरे कसे काम करतात 
ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन शोधण्यासाठी, रस्त्यावर 2 मेगापिक्सेल आणि हाय रिझोल्यूशन कॅमेरे लावले गेलेले आहेत. हे कॅमेरे 60 डिग्री पर्यंत सहज फिरू शकतात. म्हणून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करीत असताना त्यांना टाळणे अवघड आहे. या कॅमेऱ्यांसह वाहनाचा वेग शोधणे खूप सोपे झाले आहे.

स्मार्ट तंत्रज्ञान वापरले जाते
ट्रॅफिक कॅमेरा ट्रॅफिक कंट्रोल रूममधून चालविला जातो. यासाठी डेटा एन्क्रिप्ट सॉफ्टवेअर वापरले जाते. त्याच वेळी या प्रणालीमध्ये पुरावा म्हणून फोटो आणि व्हिडिओ देखील सेव्ह केले जातात. जेणेकरुन कोणताही वाद झाल्यास ते कोर्टासमोर हजर करू शकेल.

चलन कसे पाठवले जाते ?
आपण वाहतुकीच्या नियमांचे देखील उल्लंघन केल्यास ट्रॅफिक कंट्रोल रूममधून आपल्या मोबाइलवर SMS द्वारे ई-चलन पाठविले जाते. जर आपण चलनाची रक्कम वेळेवर जमा केली नाही तर आपले वाहन जप्त देखील केले जाऊ शकते. त्याच वेळी, हे काम ट्रॅफिक कंट्रोल रूममधून 24×7 केले जाते आहे.

ट्रॅफिक कॅमेऱ्यातून सूटण्याची शक्यता कमी
ई-चलन पाठवण्यापूर्वी, त्याला दोन-स्टेपच्या प्रक्रियेतून जावे लागेल. सर्वात पहिली ऑटोमेशन मार्गाने आपण ट्रॅफिकच्या नियमांचे उल्लंघन केल्याची पुष्टी केली जाते. यानंतर, हे मॅन्युअली देखील तपासले जाते. जे चुकण्याची शक्यता कमी करते.

ई-चलनाला न्यायालयात आव्हान देऊ शकता 
जर आपल्याला असे वाटत असेल की, आपण वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केलेले नाही. आपण जवळच्या ट्रॅफिक कंट्रोल रूमशी संपर्क साधू शकता. याद्वारे आपण कोर्टात ई-चलनाला आव्हान देऊ शकता.

राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Group

Leave a Comment