हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । PhonePe : भारतातील सुमारे 2.3 कोटी लोकं दररोज ट्रेनने प्रवास करतात. ज्यामुळे रेल्वेला देशाची जीवनवाहिनी असे म्हटले जाते. हा आकडा संपूर्ण ऑस्ट्रेलियाच्या लोकसंख्येएवढा आहे. रेल्वेकडून भारतीय नागरिकांना अनेक सुविधा देखील दिल्या जातात.
आताही PhonePe ने युझर्सना मोबाईल अॅपच्या मदतीने ट्रेनचे तिकीट बुक करण्याची सुविधा दिली आहे. IRCTC वेबसाइट व्यतिरिक्त, इतर अनेक मोबाइल अॅप्सद्वारे देखील ऑनलाइन रेल्वे तिकीट बुक करण्याची सुविधा मिळते. त्याचबरोबर फोनपेद्वारे रिफंड आणि कोणत्याही शुल्काशिवाय तिकीट देखील रद्द करता येतात. तसेच या अॅपद्वारे, रेल्वे मार्गाच्या माहितीबरोबरच सर्व मेल एक्सप्रेस आणि सुपरफास्टसहीत इतर श्रेणींची रेल्वे तिकिटेही सहजपणे बुक करता येतील. चला तर मग त्याविषयीची प्रक्रिया जाणून घेऊयात…
PhonePe वर अशा प्रकारे बुक करा ट्रेनचे तिकीट
ट्रेनचे तिकीट बुक करण्यासाठी मोबाईलमध्ये PhonePE अॅप वर उघडा.
या अॅपच्या तळाशी स्क्रोल करा आणि ट्रॅव्हल बुकिंग पर्यायाखालील ट्रेनवर क्लिक करा.
ट्रेनवर क्लिक केल्यानंतर, ट्रॅव्हल डिटेल्स एंटर करा आणि सर्च ट्रेनच्या पर्यायावर क्लिक करा.
यानंतर संबंधित गाड्यांची लिस्ट उघडेल, येथे आपल्या सोयीनुसार ट्रेन निवडा.
बुकिंगसाठी अॅपमध्ये IRCTC लॉगिन आयडी विचारला जाईल. यासाठी आवश्यक असलेले डिटेल्स एंटर करा.
यानंतर, स्लीपर, एसी थर्ड आणि सेकंड एसी या सर्व श्रेणींमध्ये उपलब्धतेची माहिती समोर येईल.
बुक तिकीटवर क्लिक करा आणि IRCTC युझर आयडी एंटर करा.
यानंतर ट्रॅव्हल डिटेल्सशी संबंधित नाव, वय आणि पत्ता एंटर करा.
पेमेंट ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर Proceed बटणावर क्लिक करा.
याद्वारे ट्रेनचे तिकीट बुक केले जाईल.
हे लक्षात घ्या कि, PhonePe ने UPI द्वारे एका दिवसात जास्तीत जास्त ट्रान्सझॅक्शन लिमिट 1 लाख रुपये निश्चित केले आहे. ज्यामध्ये आता कोणालाही या अॅपद्वारे एका दिवसात जास्तीत जास्त 10 किंवा 20 ट्रान्सझॅक्शन करता येतील. फोनपेने कोणत्याही तासासाठी ट्रान्सझॅक्शन लिमिट निश्चित केलेले नाही.
अधिक माहितीसाठी या वेबसाईटला भेट द्या :https://www.phonepe.com/
हे पण वाचा :
SBI कडून ग्राहकांना भेट, बँकेने FD वरील व्याजदरात केली वाढ
LPG सिलेंडरच्या बुकिंगवर 1000 रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळण्याची संधी !!! कसे ते जाणून घ्या
Union Bank of India कडून ग्राहकांना धक्का, होमलोनवरील EMI वाढणार
Stock Tips : आगामी काळात ‘हे’ 5 स्टॉक देऊ शकतील मोठा रिटर्न, आपल्या प्रोफोलिओमध्ये आजच करा समावेश
Train Cancelled : रेल्वेकडून आज 271 गाड्या रद्द !!! अशा प्रकारे तपासा रद्द झालेल्या गाड्यांची लिस्ट