नवी दिल्ली । डिजिटल पेमेंट अॅप पेटीएम युझर्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. आता पेटीएम वापरणाऱ्या लोकांना रेल्वे तिकीट खरेदी करण्यासाठी रेल्वे स्थानकांवर लांब रांगेत उभे राहावे लागणार नाही. खरेतर, डिजिटल पेमेंट कंपनी पेटीएमने गुरुवारी जाहीर केले की, त्यांनी देशभरातील रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ऑटोमॅटिक तिकीट व्हेंडिंग मशिन्स (ATVM) द्वारे ग्राहकांना डिजिटल तिकीट सर्व्हिस देण्यासाठी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) सोबत भागीदारी केली आहे.
देशभरातील रेल्वे स्थानकांवर तिकीट वेंडिंग मशिन्स (ATVM) बसवण्यात आल्या आहेत. याअंतर्गत आता रेल्वे स्थानकांवर बसवण्यात आलेल्या ATVM वर पेटीएम QR कोड स्कॅन करून UPI द्वारे पेमेंट करून तिकीट खरेदी करता येणार आहे. रेल्वे स्थानकांवर इन्स्टॉल ATVM हे टच स्क्रीन बेस्ड टिकटिंग कियोस्क आहेत जे प्रवाशांना स्मार्ट कार्डशिवाय डिजिटल पेमेंट करू देतात.
‘या’ सुविधा मिळतील
स्क्रीनवरील QR कोड स्कॅन करून प्रवासी अनारक्षित रेल्वे तिकीट आणि प्लॅटफॉर्म तिकीट खरेदी करू शकतात. याशिवाय, तुम्ही तुमच्या सीज़नल तिकिटांचे रिन्यूअल करू शकता आणि स्मार्ट कार्ड रिचार्ज करू शकता. पेटीएम प्रवाशांना पेटीएम UPI, पेटीएम वॉलेट, पेटीएम पोस्टपेड (आधी खरेदी करा, नंतर पैसे द्या), नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्डसह विविध पेमेंट ऑप्शनद्वारे पेमेंट करू देते.
ATVM द्वारे तिकीट कसे बुक करावे ?
>> जवळच्या रेल्वे स्टेशनवर असलेल्या AVTM मध्ये तिकीट बुक करण्यासाठी मार्ग निवडा.
>> रिचार्जसाठी स्मार्ट कार्ड क्रमांक टाका.
>> पेमेंट ऑप्शन म्हणून पेटीएम निवडा.
>> स्क्रीनवर उपलब्ध QR कोड स्कॅन करा.
>> यानंतर फिजिकल तिकीट तयार होईल.
>> जर तुम्ही स्मार्ट कार्ड रिचार्ज करण्याचा पर्याय निवडला असेल तर रिचार्ज होईल.