मनमाडमध्ये रेल्वे आणि ट्रेनचा भीषण अपघात, रेल्वेचा एक डब्बा रुळावरून घसरला

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मनमाड : हॅलो महाराष्ट्र – आशिया खंडातील दुसऱ्या क्रमांकाचे अन्नधान्य गोदाम असलेल्या मनमाडच्या एफसीआयमध्ये मालवाहतूक करणारी रेल्वे व गोदामात माल भरण्यासाठी आलेला ट्रक यामध्ये भीषण अपघात (train truck accident) झाला आहे. या अपघातात रेल्वे मालगाडीचा एक डब्बा रुळावरून घसरला आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या अपघातात (train truck accident) ट्रकचालक थोडक्यात बचावला आहे. मात्र ट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. गोदाम क्रमांक 24 जवळ हा अपघात (train truck accident)  झाला आहे.

हाती आलेल्या माहितीनुसार, गोदामात माल भरण्यासाठी ट्रक आला होता. मात्र त्याच दरम्यान माल वाहतूक करणारी रेल्वे देखील आली. अंदाज न आल्याने हा अपघात (train truck accident) झाला आहे. या अपघातात ट्रक चालक थोडक्यात बचावला आहे. मात्र ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे. अपघातानंतर रेल्वेचा एक डब्बा रेल्वे रुळावरून खाली घसरला आहे.

पनवेल लोकल चुनाभट्टी स्थानकात बंद
दरम्यान दुसरीकडे शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास पनवेलला जाणारी लोकल चुनाभट्टी स्थानकात बंद पडली होती. ही लोकल रात्री अंदाजे 11.24 च्या सुमारास चुनाभट्टी स्थानकात आली, त्यानंतर ती बंद पडली. 35 मिनिटांपेक्षा अधिक काळ ही रल्वे चुनाभट्टी स्थानकातच उभी होती. त्यामुळे प्रवाशांचे मोठ्या प्रमाणात हाल झाले होते. लोकल ठप्प झाल्याने प्रवाशांना तब्बल एक तासांच्या आसपास स्थानकात ताटकळत उभे राहावे लागले होते.

हे पण वाचा :
गेल्या पाच वर्षांत ‘या’ शेअर्सने दिला 450% रिटर्न, गुंतवणूकदार झाले मालामाल

‘या’ अभिनेत्याचं अल्पवयीन मुलींसमोर पार्कमध्ये अश्लील कृत्य; POCSO कायद्यांतर्गत पोलिसांकडून अटक

LIC च्या ‘या’ पॉलिसीद्वारे फक्त 150 रुपयांमध्ये मिळवा 19 लाख रुपये !!!

भरधाव ट्रेनची ट्रकला धडक; अपघाताचा लाईव्ह व्हिडिओ आला समोर

‘या’ 5 शेअर्सनी एका वर्षात गुंतवणूकदारांना दिला भरघोस नफा !!!

Leave a Comment