हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | प्रसिद्ध बिल्डर अविनाश भोसले यांच्याकडून ईडी अधिकाऱ्याला कोट्यवधी रुपये ट्रान्सफर झाले आहेत असा गंभीर आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला आहे. जितेंद्र नवलानी असे त्या वरिष्ठ ईडी अधिकाऱ्याचे नाव असून त्यांच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहे. पुण्यातील बिल्डर अविनाश भोसलेंनीही १० कोटी रुपये दिले आहेत, असेही राऊत यांनी सांगितले. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे पत्रकार परिषद घेत भाजप आणि केंद्रीय तपास यंत्रणांवर निशाणा साधला.
ईडीकडून 100 हून जास्त व्यावसायिकांना धमकावलं जातं आणि त्यांच्याकडून खंडणी वसुल केली जाते. जितेंद्र नवलानी हा व्यक्ती ईडीचे हे रॅकेट चालवतो. नवलानी हा कन्सल्टन्सी कंपनी चालवतो पण त्याच्या कार्यालयात कोणताही कर्मचारी नाही, मग तो कोणती कंपनी चालवतो. केंद्रीय एजन्सीजना हाताशी धरून महाराष्ट्राचं महाविकास आघाडी सरकार पाडण्याचा भाजपचा डाव आहे, असा थेट आरोप शिवसेना खासदार संजय राऊत यांनी केला.
भाजपचे नेते भ्रष्टाचार करत आहेत. बोगस कंपन्या दाखवून गैरव्यवहार करत आहेत आणि यासंदर्भात आपल्याकडे पुरावे आहेत, असं राऊत म्हणाले. ‘ED आणि Income Tax विभागाला मी 50 नावं दिली आहेत. पण त्यांनी अद्याप काही केलेलं नाही. असे राऊत यांनी म्हंटल.
ईडीच्या सर्वात जास्त कारवाया या महाराष्ट्रात होत आहेत. महाविकास आघाडीच्या १४ प्रमुख नेत्यांवर ईडीने कारवाई केली आहे. भाजपा नेत्यांवर कोणत्याही तपास यंत्रणांची कारवाई झालेली नाही. ते लोक मुंबईच्या रस्त्यांवर वाटी घेऊन भीक मागत आहेत का? इनकम आणि टॅक्स फक्त आमच्याचकडे आहे का? या सर्व कारवाया कोण नियंत्रीत करत आहे याबाबत शिवसेना लवकरच मोठा खुलासा करणार आहे,” असे संजय राऊत म्हणाले.