“बाधवानशी काडीमात्र संबंध नाही, संजय राऊतांकडून आरोपांची नौटंकी केली जातेय”; किरीट सोमय्यांचे प्रत्युत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेना भवन येथे दुसरी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी भाजप, ईडी, आयकर विभाग व किरीट सोमय्या यांच्यावर आरोप केला. राऊतांच्या आरोपानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी प्रत्युत्तर दिले आहे. “संजय राऊतांकडून माझ्यावर जे आरोप केले आहरेत. ते त्यांनी गेल्या महिन्यातही केले आहेत. वास्तविक राकेश बाधवानशी माझा संबंध नाही. उपलट मी कोव्हीड घोटाळा बाहेर काढला म्हणून माझ्यावर आरोप करीत राऊतांकडून नौटंकी केली जात आहे,” असे प्रत्युत्तर सोमय्या यांनी दिले.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतल्यानंतर भाजप नेते किरीट सोमय्या यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, “संजय राऊत यांनी जे आरोप केले आहेत कि माझा वाधनवानशी संबंध आहे. मात्र, वास्तविक पाहता माझा वाधनवानशी काडीमात्र संबंध नाही. जितेंद्र नवलानी यांनाही मी ओळखत नाही. तरीही मी महाराष्ट्रातील भ्रष्टाचार बाहेर काढत असेल आणि त्यासाठी मी आदींचा वसुली एजंट आहे, असा माझ्यावर कोणी आरोप करत असेल तर मला काहीही फरक पडत नाही, असे सोमय्या यांनी म्हंटले.

काय केले आहेत संजय राऊतांनी आरोप?

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी आज शिवसेना भवन येथे दुसरी पत्रकार परिषद घेत ईडी आणि किरीट सोमय्यांवर आरोप केले. आज आयकर विभागाची कारवाई करण्यात आली. भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी काही दिवसापूर्वी भ्रष्टाचाराचे पुरावे दिले होते. सध्या आयटीची भानामती सुरु आहे. आजही ईडीच्या अधिकाऱ्यांकडून अधिकारी बिल्डर्स, कॉर्पोरेटर्सना धमकावण्याचे काम केले जात आहे. ज्या ज्या कंपनीची ईडीने चौकशी केली त्या कंपन्यांनी जितेंद्र नवलानी यांच्या खात्यावर पैसे पाठवले आहेत. अविनाश भोसलेंची चौकशी झाली मग भोसलेंकडून 10 कोटी ट्रान्सफर केले नवलानीला नवलानीच्या सात कंपनीन कोट्यवधी रुपये ट्रान्सफर केले गेले, असे आरोप राऊत यांनी केले आहेत.

Leave a Comment