एसटी कर्मचाऱ्यांना मेस्मा लावणार का?; अनिल परब यांनी दिली ‘ही’ महत्वाची माहिती

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । एसटी कर्मचाऱ्यांचा तिढा अजूनही सुरूच आहे. कर्मचाऱ्यांना मेस्मा लावण्याची डेडलाईनही संपली आहे. त्यामुळे आज या कर्मचाऱ्यांना मेस्मा लागणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागले होते. याबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी महत्वाची माहिती दिली आहे. कामगारांशी बैठक झाली असून कामगारांना मेस्मा लावण्याबाबत चर्चा झाली. यामध्ये सध्यातरी कामगारांवर मेस्मा लावण्याचा निर्णय अद्याप घेतलेला नाही, असे परिवहनमंत्री अनिल परब यांनी असे स्पष्ट केले आहे.

एसटी कामगारांशी झालेल्या बैठकीनंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, निलंबित झालेल्या कामगारांवर कारवाई सुरू आहे. काही बडतर्फ झाले आहेत. या कारवाया मागे घेतल्या जाणार आहेत. त्यामुळे कर्मचारी संपात आहेत. पण लोकांना वेठीस धरणे योग्य नाही. अशा परिस्थितीत अत्यावश्यक सेवा म्हणून मेस्मा लावला जातो. या बाबतीत कामगारांशी आताच झालेल्या बैठकीत चर्चा केली. त्यांना मेस्मा लावण्यासंदर्भात माहितीही दिली आहे. सध्यातरी 20 तारखेपर्यंत कारवाई केली जाणार नाही.

कामगारांसाठी ज्या गोष्टी करणे शक्य होते ते सर्व केले आहे. सर्वाधिक पगारवाढ दिली आहे. पगार वेळेत देण्याची हमी घेतली आहे. तरीही कामगार भरकटलेले आहेत. दिशाहीन झाले आहेत. त्यांना वाटते ताबडतोब आपला निकाल लागेल. पण कोर्टाने त्रिसदस्यीय समिती नेमली आहे. त्यामुळे सरकार निर्णय घेऊ शकत नाही. आम्ही हे वारंवार सांगत आहोत. 20 तारखेला विलीनीकरण करून घेऊ, असे त्यांचे वकील सांगत आहे, असे त्यांनी सांगितले.

Leave a Comment