एसटी कर्मचाऱ्यांसाठी खुशखबर; परिवहमंत्री अनिल परब यांनी केल्या ‘या’ मोठ्या घोषणा

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । गेल्या चौदा दिवसांपासून केल्या जात असलेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या संपाबाबत तोडगा काढण्यासाठी व कर्मचाऱ्यांच्या पगारवाढी संदर्भात परिवहनमंत्री अनिल परब यांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी परिवहनमंत्री अनिल परब यांनी “एसटी कर्मचाऱ्यांचा पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता देण्यात आली आहे. राज्य सरकारने कर्मचाऱ्यांच्या पगार वाढविण्याचा निर्णय मान्य केला आहे. राज्य सरकारच्या कर्मचाऱ्यांना देण्यात येणाऱ्या पगाराप्रमाणे एसटी कर्मचाऱ्यांना पगार दिला जाणार आहे. जे कर्मचारी एक ते दहा वर्ष वर्गातील आहेत. त्यांच्या मूळ वेतनात पाच हजाराची वाढ करण्यात येणार असल्याची घोषणा परिवहनमंत्री अनिल परब यांनी केली.

परिवहनमंत्री अनिल परब यांनी पत्रकार परिषद घेत माध्यमांशी संवाद साधला. यावेळी भाजप नेते गोपीचंद पडळकर, उच्च तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत उपस्थित होते. यावेळी ते म्हणाले की, राज्य सरकारने आतापर्यतच्या एसटीच्या इतिहासात इतकी पगारवाढ करण्यात आलेली नाही. वीस वर्ष व त्याहून अधिक सेवा करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा पगार हा पाचशे रुपयांनी वाढविण्यात आला आहे. कर्मचाऱ्यांचे पगार कमी असल्याचे सांगितले जात होते. मात्र, आता त्यांच्या पगारवाढीचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांचा पगार महिन्याच्या दहा तारखेच्या आतकरणार असल्याचा निर्णय घेतला आहे. एसटी कर्मचाऱ्यांची जवळजवळ 41 टक्के पगार वाढ करण्यात आली असल्याचे परब यांनी सांगितले.

अखेर ST कर्मचारी संपावर तोडगा निघाला! परिवहन मंत्री परब यांची पत्रकार परिषदेत मोठी घोषणा!

राज्यभर एसटी कर्मचाऱ्यांच्यावतीने संप पुकारण्यात आला आहे. त्यांच्याकडून काही मागण्या करण्यात आल्या होत्या. त्यामध्ये कर्मचाऱ्यांची एकच मागणी होती कि विलीनीकरण करण्यात यावे. उच्च न्यायालयात हा विषय गेला त्यावेळी न्यायालयाने त्रिसदसिय समिती नेमली. तिने बारा आठवड्यामध्ये निर्णय घ्यावा असे सांगितले. समितीचा अहवाल यायला अजून बराचवेळ आहे. याबाबत आमदार पडळकर, सदाभाऊ खोत, उच्चं तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी पुढाकार घेतला. राज्य सरकारकडून एसटी कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाशी बैठक घेत चर्चा केली. त्यामध्ये अंतरिम पगारवाढीचा मुद्दा शिष्टमंडळाकडून उपस्थित करण्यात आला. त्यानंतर या प्रस्तावा बाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे व अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा केली त्यांनी पगारवाढीच्या प्रस्तावाला मान्यता दिली.

अनिल परब यांनी केल्या ‘या’ महत्वाच्या घोषणा

1. एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात जवळपास 41 टक्के वाढ करण्यात येत आहे.
2. जे कर्मचारी 1 ते 10 वर्ष कॅटेगरीत आहेत त्यांना 5000 रुपये पगारवाढ.
3. 12 हजार 80 रुपये होते त्यांचे आता 17 हजार असेल.
4. ज्यांचा पगार 17 होता तो 24 हजार असेल.
5. सर्वसाधारण पगारात सात हजार रुपयांची वाढ.
6. 10 ते 20 वर्षे सेवा- मूळ वेतनात 4 हजार रुपयांची वाढ.
7. 20 वर्षापेक्षा अधिक झालेत त्यांना 2 हजाराने वाढ.
8. समिती जो विलीनीकरणाबत निर्णय घेईल तो राज्य सरकारला मान्य असणार.
9. एसटी कर्मचाऱ्यांचे निलंबन व सेवा समाप्ती निर्णय मागे घेणार.

सदाभाऊ खोत व गोपीचंद पडळकर याची सकारात्मक भूमिका – उदय सामंत

आज एसटी कर्मचाऱ्यांच्या विलीनीकरणाच्या प्रश्नाबाबत परिवहनमंत्री अनिल परब यांनी शिष्टमंडळाशी जी चर्चा केली. याबाबत एसटी कर्मचाऱ्यांच्या हिताचा निर्णय घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करून हिताचा चांगला निर्णय घेतला आहे. परब यांच्या प्रस्तावाच्या घोषणेला भाजप नेते गोपीचंद पडळकर, शेतकरी संघटनेचे नेते सदाभाऊ खोत यांनी मान्यता दिली आहे. त्यांनीही सकारात्मक भूमिकाघेतली आहे. त्यामुळे आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप 100 टक्के मिटला असल्याचे मला वाटत असल्याचे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

असा आहे एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून प्रस्ताव –

1. एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनवाढीचा सरकारकडून प्रस्ताव
2. किमान 5000 ते कमाल 21 हजारापर्यंत वेतनवाढीचा प्रस्ताव
3. कमी वेतन असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या पगारात जास्त वाढ करमार
4. एसटी कर्मचाऱ्याला प्रत्येक महिन्याला वेळेत पगार मिळण्याची खबरदारी
5. प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारखेला पगार होण्याची खबरदारी घेणार
6. वरिष्ठ कर्मचाऱ्यांचं वेतन 50 हजाराहून जास्त असल्याल त्यांना कमी वेतनवाढ

Leave a Comment