खाजगी बसचा अपघात, सुदैवाने ३३ प्रवासी बचावले  

प्रातिनिधिक छायाचित्र
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

सातारा प्रतिनिधी । मुंबईवरून म्हसवडकडे जात असलेल्या ट्रॅव्हलस बसचा फलटणमध्ये भीषण अपघात झाला. बारामती पूलाजवळ स्मशानभूमी शेजारील बानगंगा नदीच्या कठड्याला धडकून बस खाली गेली. बसमध्ये प्रवास करणारे ३३ प्रवासी जखमी झाले आहेत.  मात्र, या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

अपघातानंतर प्रवासी कमालीचे घाबरले. बसची पुलाच्या अलीकडील बाजूला धडक बसली असती तर बस नदीत गेली असती. यामुळ मोठी जिवीतहानी झाली असती. भानुदास सावंत या बस चालकान गाडीवर नियंत्रण मिळवल. त्यामुळं मोठा अनर्थ टळला. अपघातानंतर रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. फलटण शहर पोलीसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेवून वाहतूक सुरळीत केली.

घटनास्थळी उपस्थित नागरिकांनी अपघातग्रस्त बस बाजुला काढली. सोबतच बसमधील प्रवांशाना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आल. बाकीच्या प्रवाशांना दुसर्‍या बसमध्ये बसवून रवाना करण्यात आलं. या घटनेचा अधिक तपास पोलीस नाईक गिरी करत आहेत.

इतर काही बातम्या-