हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन | मुंबई आणि मुंबईचा प्रवास म्हणजे प्रचंड गर्दी आणि आणि ट्राफिकची डोकेदुखी असते. त्यामुळे मुंबईकर नेहमी आपला प्रवास कसा सोयीचा आणि कमी वेळात होईल असे वाटत राहते. सरकार कडून सुद्धा सातत्याने यासाठी प्रयत्न सुरु असतात. सध्या संपूर्ण देशात रस्ते वाहतुकीचे काम मोठ्या जोमाने सुरु आहे. त्यातच आता मुंबईकरांसाठी सुद्धा एक आनंदाची बातमी आहे. आता येणाऱ्या नवीन वर्षात नवी मुंबईतून कल्याण डोंबिवलीचा प्रवास हा केवळ 10 मिनिटाचा होणार आहे. तो कसा? ते जाणून घेऊयात.
येणाऱ्या नव्या वर्षात कल्याणचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदार संघामधून अनेक विविध प्रकल्पाला दुजोरा मिळणार आहे. शिंदेनी मतदार संघाची पाहणी केली असता नवीन प्रकल्पासंबंधी अधिकाऱ्यांना काम वेळेत पूर्ण करण्याचे आदेश केले दिले आहेत. या नवीन प्रकल्पामुळे कल्याण वासियांना दिलासा मिळणार आहे.
कोणते आहेत प्रकल्प?
प्रवासाचा वेळ कमी करण्यासाठी तसेच वाहतूक कोंडीपासून वाचण्यासाठी मतदारसंघाद्वारे शिळफाटा- कल्याण रोडच्या सहा मार्गिका, मुंब्रा वाय जंक्शन पुलाच्या निर्मितिचे काम, इथेच ऐरोली-कटाई उन्नत मार्ग, महापे रोड पाइपलान रस्तेमार्गावरही फ्लायओव्हरची निर्मिती. तसेच शिळफाटा फ्लायओव्हरचे बांधकाम सध्या सुरु आहे. यामुळे विकासाला चालना मिळणार आहे. तसेच नागरिकांच्या समस्येला आळा घालण्यासाठी हे प्रकल्प उपयुक्त होणार आहेत. असे म्हणायला हरकत नाही.
नवी मुंबई, कल्याण आणि डोंबिवली अंतर होणार केवळ 10 मिनिटाचे
मतदार संघाच्या होणाऱ्या या प्रकल्पामुळे येणाऱ्या वर्षात नागरिकांच्या समस्या दुर होणार आहेत. या प्रकल्पांमुळं कल्याण-डोंबिवलीसह संपूर्ण महामुंबईच्या प्रवासाचे अंतर कमी होणार आहे. त्यामुळे सध्या सुरु असलेल्या ऐरोली आणि कटाईच्या दरम्यान बोगद्याचे काम पूर्ण झाल्यानंतर जिथे प्रवासला 45 मिनिट लागायचे तिथे नवी मुंबई आणि कल्याण- डोंबिवलीपर्यंतचे अंतर केवळ 10 मिनिटांत पूर्ण होणार आहे. या ऐरोली कटाई उन्नत मार्गाची एकूण लांबी ही 12.3 किमी एवढी असून पहिल्या टप्प्यात ठाणे-बेलापूरहून राष्ट्रीय राजमार्ग संख्या 4 पर्यंतची एकूण लांबी ही 3.43 किमी एवढी आहे. त्यामुळे या मार्गावरील बोगद्याची लांबी ही 1.68 किमी एवढी आहे. हे प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर होणारी वाहतूक कोंडी नक्कीच कमी होईल अशी आशा व्यक्त केली जात आहे.