हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । NZ vs IND: टी -२० मालिका आणि एकदिवसीय मालिकेनंतर भारत आणि न्यूझीलंड यांच्यात आता कसोटी मालिका आहे. न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्या दोन कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिला सामना २१ फेब्रुवारीपासून वेलिंग्टनमध्ये खेळला जाईल. डावखुरा वेगवान गोलंदाज ट्रेंट बोल्टहा दुखापतीतून सावरला असून कसोटी सामन्यांमध्ये खेळण्यास सज्ज झाला आहे. कसोटी मालिकेपूर्वी न्यूझीलंड संघासाठी हि चांगली बातमी आहे. कसोटी मालिकेचा पहिला ‘माइंड गेम’ खेळत ट्रेंट बोल्टने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला इशारा दिला आहे. बोल्टला या कसोटी मालिकेत भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहलीचा विकेट घेऊन आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील आपले पुनरागमन संस्मरणीय बनवायचे आहे. भारत आणि न्यूझीलंड यांच्यात झालेल्या पाच टी -२० सामन्यांच्या मालिकेत भारताने ५-० च्या फरकाने विजय मिळवला होता, पण त्यानंतर न्यूझीलंडने तीन एकदिवसीय सामन्यात ३-० असा एकतर्फी विजय नोंदवून बरोबरी साधली.
विशेष म्हणजे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉक्सिंग डे कसोटीत बोल्टचा हात फ्रॅक्चर झाला होता, ज्यामुळे तो भारता विरुद्ध मर्यादित षटकांच्या मालिकेत न्यूझीलंडच्या संघाबाहेर गेला होता. सहा आठवड्यांनंतर संघात पुनरागमन करणाऱ्या डावखुराऱ्या वेगवान गोलंदाज बोल्टने सलामी कसोटीपूर्वी आपली प्राथमिक भूमिका स्पष्ट केली. पहिल्या कसोटीसाठी येथे आल्यानंतर तो भारतीय कर्णधाराला इशारा देताना म्हणाला,“जेव्हा मी खेळतो तेव्हा त्याच्यासारख्या फलंदाजाला (कोहली) बाद करून मी स्वत: ला सिद्ध करण्याचा प्रयत्न करतो.” मी त्याला आउट करण्याची आतुरतेने वाट पाहत आहे. पण तो एक उत्तम खेळाडू आहे हे सर्वांनाच ठाऊक आहे.
आपल्या अखेरच्या कसोटी मालिकेत न्यूझीलंडला ऑस्ट्रेलियाने ३-० ने पराभूत केले होते आणि त्यांच्यासाठी भारतही एक कठीण आव्हान आहे. बोल्ट पुढे म्हणाला, ‘भारत हा एक मजबूत संघ असून आयसीसी कसोटी अजिंक्यपद टेबलमध्ये अव्वल आहे. खेळ कसा खेळायचा याबद्दल ते स्पष्ट आहेत. आम्हाला ऑस्ट्रेलियामध्ये आमच्यासाठी कठीण काळ होता.हे पाहून चांगले वाटले कि,आम्ही मालिकेत परत येत आहोत.येथील बेसिन रिझर्व्ह ग्राऊंडच्या खेळपट्टीवर वेगवान गोलंदाजांना मदत केली जाईल, जेथे बोल्ट भारतीय फलंदाजांना अडचणीत आणू शकतो. न्यूझीलंडकडून ६५ कसोटी सामन्यांमध्ये २५६ बळी घेणारा ३० वर्षीय खेळाडू म्हणाला,“मी विकेट घेण्याची चांगली तयारी करत आहे.सहसा इथली खेळपट्टी चांगली असते आणि सामना हा पाच दिवस चालतो. मला येथे खेळायला आवडते.मी सामना सुरू होण्याची वाट पाहत आहे.” टी -२० आंतरराष्ट्रीय सामन्यात भारताकडून ५ -० असा पराभव पत्करावा लागणे निराशाजनक असल्याचे बोल्टने सांगितले पण संघाने एकदिवसीय मालिकेत पुनरागमन केले आणि एकदिवसीय मालिका ३-० ने जिंकली. तो म्हणाला,“मला वाटते जे झाले ते झाले. मी मागील सहा आठवडे केव्हाच मागे सोडले आहे आणि जे माझ्या नियंत्रणात आहे ते करण्याचा मी प्रयत्न करीत आहे.”