हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन| तृणमुल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना निलंबित करण्याची कारवाई करण्यात आली आहे. विधानसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी ‘कॅश फॉर क्वरी’ प्रकरणी त्यांच्यावरही कारवाई केली आहे. आज लोकसभेत या प्रकरणासंबंधीत एथिक्स कमिटीचा अहवाल सादर केला गेला. या अहवालामध्येच महुआ यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली होती.
या मागणीनंतर ओम बिर्ला यांनी महुआ मोईत्रा यांना निलंबित केले.
नेमकं प्रकरण काय?
समोर आलेल्या माहितीनुसार, खासदार निशिकांत दुबे यांनी खासदार महुआ मोइत्रा यांच्या विरोधात तक्रार दाखल केली होती की त्यांनी सभागृहामध्ये प्रश्न विचारण्यासाठी पैसे घेतले आहेत. याचा तपास करण्यासाठी 15 ऑक्टोबर 2023 रोजी एथिक्स कमिटीकडे सोपवण्यात आला होता. याच प्रकरणाची सकल चौकशी केल्यानंतर आज कमिटीने अहवाल सादर केला.
या अहवालात कमिटीने म्हटले की, महुआ मोइत्रा यांचे वागणे अनैतिक आणि खासदार म्हणून अशोभनिय आहे. त्यामुळे त्यांनी लोकसभा सदस्यत्वपदी राहणे योग्य राहणार नाही. त्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी. यानंतर लोकसभेमध्ये यासंबंधित मतदान घेतले गेले. तसेच, याचा प्रस्ताव देखील लोकसभेत स्वीकारण्यात आला. यानंतरच ओम बिर्ला यांनी याप्रकरणामुळे महुआ मोइत्रा यांची खासदारकी रद्द केली.