नेपाळ आणि श्रीलंकेतही येणार भाजप सरकार ; अमित शहांकडे संपूर्ण योजना तयार

0
45
amit shah
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | त्रिपुराचे मुख्यमंत्री आणि भाजप नेते बिप्लब कुमार देब यांनी भारतीय जनता पक्षाच्या विस्ताराबद्दल भाष्य करताना नेपाळ आणि श्रीलंकेत सुद्धा भारतीय जनता पक्षाची सत्ता येणार आहे असं गजब वक्तव्य केले आहे. आगरताळा येथील पक्षाच्या कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले असून अमित शहा यांनी मुक्तकंठाने प्रशंसा केली आहे.

भाजपनं केवळ देशातच नव्हे, तर परदेशातही विस्तार करण्याची योजना आखली आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत भाजपचं सरकार स्थापन करण्याची योजना शहांकडे आहे, असं देब यांनी पक्षाच्या कार्यक्रमात सांगितलं. २०१८ मध्ये त्रिपुरामध्ये विधानसभेची निवडणूक झाली. त्यावेळी झालेल्या एका बैठकीत झालेल्या संवादाचा तपशील यावेळी देब यांनी दिला. ‘विधानसभेच्या निवडणुकीसाठी पक्षानं बैठक आयोजित केली होती. त्या बैठकीला अमित शहा उपस्थित होते. त्यावेळी पक्षाचं नेतृत्त्व शहांकडे होतं,’ असं देब म्हणाले.

तीन वर्षांपूर्वी झालेल्या त्या बैठकीत शहांनी परदेशातील विस्ताराच्या योजनेवर भाष्य केलं होतं. त्यावेळी आम्ही अतिथीगृहात बसलो होतो.भाजपनं अनेक राज्यांमध्ये सरकार स्थापन केल्याचं ते म्हणाले. त्यावर श्रीलंका आणि नेपाळ अद्याप शिल्लक असल्याचं शहांनी म्हटलं. आपल्याला पक्षाचा विस्तार करायचा आहे. नेपाळ आणि श्रीलंकेत सरकार स्थापन करण्यासाठी पक्षविस्तार करायचा आहे, असं त्यावेळी शहा म्हणाले होते,’ असं देब यांनी सांगितलं.

यावेळी देब यांनी अमित शहांच्या नेतृत्त्वाची मुक्तकंठानं स्तुती केली. अमित शहांच्या नेतृत्त्वाखाली भाजप जगातला सर्वात मोठा पक्ष झाल्याचं ते म्हणाले. ‘केरळमध्ये दर पाच वर्षांनी सरकार बदलतं. डावे आणि काँग्रेस आलटून पालटून सत्तेत येतात. पण हा ट्रेंड भाजप बदलेल. केरळमध्ये भाजपचं सरकार येईल,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. पश्चिम बंगालमध्ये मुख्यमंत्री ममता बॅनर्जींच्या तृणमूल काँग्रेसचा पराभव करून भाजप सत्ता स्थापन करेल, असंदेखील देब म्हणाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला whatsapp करा आणि लिहा ‘Hello News’

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here