कोरोनासुद्धा एक जीव आहे, त्यालाही जगण्याचा अधिकार; भाजपच्या माजी मुख्यमंत्र्यांनी उधळली मुक्ताफळे

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | देशात कोरोनाने अक्षरशः थैमान घातले असून रुग्णसंख्येत प्रचंड वाढ होत आहेत. अनेक लोकांना कोरोनामुळे आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे देशात सर्वत्र चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून अशातच उत्तराखंडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंह रावत यांनी करोना विषाणूसंदर्भात एक विचित्र वक्तव्य केलं आहे.

त्रिवेंद्र सिंह रावत म्हणाले, कोरोना व्हायरस एक जीव आहे, इतर लोकांप्रमाणे त्यालाही जगण्याचा अधिकार आहे. मात्र आम्ही मानव स्वत:ला बुद्धीमान समजतो आणि त्याला संपविण्यासाठी तयार आहोत. यामुळे कोरोना स्वत:ला सतत बदलत आहे. रावत यांनी पुढे म्हटले की, मानवाला सुरक्षित राहण्यासाठी कोरोना व्हायरसच्या पुढे जाण्याची गरज आहे.

दरम्यान त्रिवेंद्र सिंह रावत यांच्या या विधानावरून काँग्रेससहीत विरोधी पक्षांनी त्रिवेंद्र सिंह यांच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आहे. काँग्रेसच्या डिजिटल टीममधील सदस्य आणि नेते असणाऱ्या गौरव पांधी यांनी अशा लोकांमुळेच आपल्या देशाला आज करोना संकटाचा समाना करावा लागत असल्याचा टोला लगावला आहे.

ब्रेकिंग बातम्या सर्वांत अगोदर मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा 9028429273 हा नंबर तुमच्याकडील WhatsApp ग्रुपला Add करा.

Leave a Comment