Saturday, March 25, 2023

ट्रकच्या धडकेत बापलेकीचा मृत्यू; गर्भवतीसह मुलगी गंभीर जखमी

- Advertisement -

जाफराबाद | उभ्या ट्रक वर दुचाकी धडकून बापलेक ठार तर गर्भवती महिलेसह तीन वर्षाची मुलगी गंभीर जखमी झाल्याची घटना गुरुवारी दुपारी साडेचार वाजेच्या सुमारास जाफराबाद ते माहोरा रोडवरील चिंचखेडा फाट्याजवळ घडली. मदन पांडुरंग शेजुळ (वय 36), आकांशा मदन शेजुळ (4, म्हसरूळ) अशी मृतांची नावे आहेत.

माहोरा रस्त्यावर चिंचखेडा फाट्याजवळील आठवड्यात दुसरा अपघात असून, अपघातात चार जणांचा बळी गेला आहे. जाफराबादकडून माहूरकडे जात असताना चिंचखेडा फाट्यावर उभ्या असलेल्या ट्रक टिप्पर (एमएच 34 बीजी 6734) वर दुचाकी (एमएच 20 जिआए 8752) मागच्या बाजूने धडकल्याने भीषण अपघात झाला.

- Advertisement -

मदन पांडुरंग शेजुळ, आकांक्षा मदन शेजुळ या बापलेकीचा मृत्यु झाला, तर चार वर्षेय मुलगी अनुष्का मदन शेजुळ या दोघी मायलेकी गंभीर जखमी झाल्या आहेत.या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलीस निरीक्षक रमेश जायभाई, पोलीस उपनिरीक्षक युवराज पोठरे, पोलीस हवालदार बी.टी. सहानी यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला.