Wednesday, March 29, 2023

Indian Idol 12- ट्रोलर्स माझ्यासाठी चिमूटभर मीठासारखे आहेत..; शन्मुखप्रियाने दिले ट्रोलर्सला सडेतोड उत्तर

- Advertisement -

हॅलो बॉलिवूड ऑनलाईन। ‘इंडियन आयडल १२’ हा सिंगींग रिअ‍ॅलिटी शो गेल्या अनेक दिवसांपासून विविध वादांमुळे चांगलाच चर्चेत आहे. एकीकडे शोचा होस्ट आदित्य नारायण ट्रोल होताना दिसतोय तर दुसरीकडे शोमधील स्पर्धक शन्मुखप्रियाने. सोशल मीडियावर तिला तिच्या गाण्याच्या शैलीवरून अतिशय ट्रोल केले जातेय. तिच्या परफॉर्मन्सवर नाराजी व्यक्त करत, अनेकांनी तिला शो बाहेर काढा अशी मागणी केली आहे. आता या ट्रोलर्सला शन्मुखप्रियाने एक जबरदस्त सडेतोड उत्तर दिले आहे.

- Advertisement -

 

ट्रोलर्सला उत्तर देताना ती म्हणाली, ‘मला शोबाहेर हाकलण्याची मागणी होतेय, हे मला माझ्या काही शुभचिंतकाकडून माहिती झाले. मी सोशल मीडियावरच्या ट्रोलर्सला फार महत्त्व देत नाही. ट्रोलर्स माझ्यासाठी चिमूटभर मीठासारखे आहेत. मायकल जॅक्सनसारखा महान कलाकारही टीकेतून सुटला नाही. त्यालाही टीका सहन करावी लागली, मग ती तर खूप लहान आहे. सिंगींग हे माझे पॅशन आहे आणि येणा-या एपिसोडमध्ये मी उत्तम गाण्याचा प्रयत्न करू शकते, इतकेच,’. Yo! Vizag ला दिलेल्या मुलाखतीत बोलताना तिने ट्रोलर्सला कमी शब्दात जोरदार चपराक लगावली आहे.

या मुलाखती दरम्यान शन्मुखप्रियाच्या आईनेही या टीकांवर बोलताना म्हटले कि, शन्मुख प्रयोगशील गायिका आहे. गाण्याची निवड करण्याची गोष्ट आहे तर सर्व स्पर्धक शो रनर्सनी निवडलेली गाणीच गातात. शन्मुखवर टीका होत असूनही ती नशीबवान आहे. कारण आता तिला लोकांचे दुप्पट प्रेम मिळतेय. शन्मुखप्रियाने गेल्या एपिसोडमध्ये प्रतिस्पर्धक आशीष कुलकर्णीसोबत ‘हमको सिर्फ तुमसे प्यार है’ हे ८०च्या दशकातील सुपरहिट गाणे गायले होते.

 

पण लोकांना या गाण्यावरील तिचा परफॉर्मन्स आवडला नाही. यावर लोकांनी तिला शोमधून बाहेर काढण्याची मागणी केली होती. तीने एका सुंदर गाण्याची वाट लावली आहे, आधी हिला शोमधून बाहेर काढा, अशा प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या होत्या.