देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर..; तृप्ती देसाईंची पोस्ट चर्चेत

FADANVIS TRUPTI DESAI
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राज्यात शिंदे- फडणवीस सरकार आलं असलं तरी देवेंद्र फडणवीस यांना उपमुख्यमंत्री दिल्याने दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांनी त्यांचे पंख छाटल्याच्या चर्चा सुरू आहेत. त्याच पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई यांनी फडणवीसांचे समर्थन करत फेसबुक पोस्ट शेअर केली आहे.

तृप्ती देसाई म्हणाल्या, देवेंद्रजींचे पंख छाटले गेले नाहीत, तर अजून उंच भरारी मारता यावी यासाठी हा केलेला प्रयोग आहे. मुख्यमंत्री पदावर असल्यावर त्यांना नगरपालिका निवडणुकीत विशेष लक्ष देता येणार नाही.

दरम्यान, एकनाथ शिंदे यांचे नाव मुख्यमंत्री पदासाठी जाहीर करतानाच आपण या मंत्रिमंडळात नसेल अशी घोषणा देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. मात्र त्यानंतर शपथविधी सोहळ्यापूर्वीच केंद्रीय नेत्यांनी फडणवीस यांना उपमुख्यमंत्री होण्याची सूचना केली. त्यानंतर त्यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. या एकुण सर्व प्रसंगांनंतर केंद्राने फडणवीसांचे पंख छान छाटले का? अशा चर्चा सुरू होत्या.