बंडातात्यांवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे- तृप्ती देसाई

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

हॅलो महाराष्ट्र ऑनलाइन | राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे आणि भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्यानंतर जेष्ठ कीर्तनकार बंडातात्या कराडकर यांच्यावर सर्वच स्तरातून टीका होत असताना तृप्ती देसाई यांनी मात्र बंडातात्यांवर टीका करणाऱ्या लोकांनाच खडेबोल सुनावले आहेत. बंडातात्यांवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे असे त्यांनी म्हंटल.

बंडातात्यांनी काल केलेले वक्तव्य संतापजनक आहेच, त्यांनी त्यावर माफी मागितली आहे. कायद्यानुसार कारवाई होईलच.परंतु बंडातात्यांवर घाणेरडे आरोप करणाऱ्यांची मानसिकता तपासली पाहिजे. बंडातात्या अनेक वर्षे व्यसनमुक्तीवर काम करतात, ते कीर्तनकार आहेतच परंतु त्यांनी समाजहितासाठी अनेक आंदोलनेही केलेली आहेत ,जी नवीन तरुण पिढीला माहितही नसतील. जे हजारो तरुणांची दारू सोडवण्यासाठी प्रयत्न केले ते कधी दारु पित नसतात, चांगल्या माणसाला विनाकारण बदनाम करु नका असे तृप्ती देसाई यांनी म्हंटल.

https://www.facebook.com/trupti.desai.589/posts/4852564834833400

बंडातात्यांनी मागितली माफी

दरम्यान, बंडा तात्या कराडकर यांनी आपल्या विधानाबाबत माफी मागितली आहे. सुप्रिया ताई आणि पंकजा ताई याना कोणतेही व्यसन नाही. मी अनावधानाने माझ्याकडुन ते विधान गेलं. मात्र आज मी त्या सर्वांची माफी मागतो. मला कोणाचाही अपमान करायचा नव्हता असेही त्यांनी म्हंटल.

Leave a Comment