हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । जपानसाठी त्सुनामी काही नवीन नाही,त्यांनी अनेक वेळा या संकटाचा सामना केलेला आहे,ज्यामुळे तेथे बरेच विनाशही झालेला आहे,परंतु जपानचे हे धैर्य आहे की ते प्रत्येक वेळी त्यातून योग्यरीत्या सावरले आहेत,असे अहवालात म्हटले आहे.असे म्हणतात की या देशात पुन्हा एकदा त्सुनामी येऊ शकते,असा इशारा येत आहे ज्यामध्ये असे म्हटले जात आहे की जपान या देशाला पुन्हा धोकादायक त्सुनामीचा सामना करावा लागेल.
या वेळी, टोकियो इलेक्ट्रिक पॉवरने,म्हणजेच टेपकोने त्सुनामीचा इशारा दिला आहे,शासकीय अहवालाचा आढावा घेताना असे म्हटले आहे की, देशाला पुन्हा एकदा त्सुनामीला सामोरे जावे लागेल,त्याचा फुकुशिमा अणु स्थानकावर परिणाम होईल.अशी शक्यताही उपस्थित केली जात आहे.
मंगळवारी एका सरकारी समितीने सांगितले की, त्सुनामीमुळे उत्तर जपानमधील होक्काइडो आणि ईशान्य भागात ३० मीटर उंच त्सुनामी येऊ शकते. तज्ञांच्या गटाने हा इशारा सर्वात वाईट परिस्थितीच्या आधारे दिला आहे आणि सांगितले की जपानी ट्रेंच आणि कुरील ट्रेंचच्या भोवतालच्या उत्तरेकडील भागात केंद्रित भूकंप येऊ शकतो.
तथापि, कॅबिनेट कार्यालयाच्या पॅनेलने असे म्हटले आहे की अशा भूकंपाच्या संभाव्यतेची गणना करणे कठीण आहे. ९.०च्या रिश्टल स्केलने २०११ मध्ये आलेल्या भूकंपाने आणि त्यानंतरच्या त्सुनामीने ईशान्य जपानमध्ये विध्वंस केला होता आणि १५,००० पेक्षा जास्त लोक ठार झाले होते,त्यावेळीही केंद्र जपान ट्रेंच हेच होते.
तथापि, यावेळच्या पॅनेलने असा अंदाज व्यक्त केला आहे की ते विशेषत: सॅन्रीकू आणि हिडेका समुद्र तसेच टोकाची आणि नेमुरो समुद्राच्या पाण्याच्या सभोवताली केंद्रित आहे.
खोल समुद्रात लपले आहे कोरोनावरचे औषध? पहा काय म्हणतायत अभ्यासक#coronavirus #coronaupdatesindia #HelloMaharashtrahttps://t.co/AmNrAG3QGs
— Hello Maharashtra (@HelloMaharashtr) April 15, 2020
ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News’.