कळंबा कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे ‘राणा-अंजली’ यांच्या हस्ते उद्घाटन

0
59
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

कोल्हापूर प्रतिनिधी । ‘कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या दिवाळी स्टॉलचे उद्घाटन ‘तुझ्यात जीव रंगला’ या मालिकेतील राणा आणि अंजलीची भूमिका बजावलेला अभिनेता हार्दिक जोशी, अभिनेत्री अक्षया देवधर यांच्या हस्ते झाले. कैद्यांच्या हस्तकलेतुन तयार केलेल्या विविध आकर्षक वस्तू विक्रीसाठी उदघाटनानंतर ठेवण्यात आल्या आहेत. त्यामध्ये दिवाळीच्या फराळासह आकाश दिवे, पणत्या, कपडे, लाकडी खुर्चा, खेळणी आदींचा समावेश आहे. कारागृहातील कैद्यांचे जीवन आणि या ठिकाणी कैद्यांवर घडविले जाणारे संस्काराचे यावेळी मान्यवरांकडून कौतुक झाले.

समाज कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडलेल्या व्यक्तीस सहजासहजी मुख्य प्रवाहात सामावून घेण्यास इच्छुक नसतो. ‘अपराधी’ या भावनेने त्यांच्याकडे पाहिले जाते. अशा काळात कारागृहातून बाहेर पडलेल्या व्यक्तीचे मानसिक खच्चीकरण होऊ नये, समाजाने त्याचा पुन्हा एक माणूस म्हणून स्वीकार करावा; समाजाच्या मुख्य प्रवाहात अभिमानाने सामील होऊन त्याला उर्वरित जीवन सुखाने व्यतीत करता यावे सोबतच त्यांच्या स्वत:च्या व कुटुंबाच्या उदरनिर्वाहासाठी कारागृहात कौशल्य शिक्षण मिळायला हवे, या उद्देशाने कळंबा कारागृह प्रशासनाने बंदीजनांसाठी नऊ उद्योग सुरू केले आहेत.

त्याकरिता लागणारी यंत्रे व साधनसामग्री उपलब्ध केली आहे. फौंड्री, सुतार, लोहार, जरीकाम, टेलरिंग, कापडनिर्मिती, हातमाग, रंगकाम, बेकरी आदी विविध प्रकारचे उद्योग सुरू करून कळंबा कारागृहाने राज्यात नावलौकिक मिळविला आहे. ६०० बंदीजनांच्या हातून बनलेल्या आकर्षक वस्तूं दिवाळीनिमित्त कळंबा कारागृहाच्या प्रवेशद्वाराशेजारी विक्रीकेंद्रात ठेवल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here