तुळजापूर प्रतिनिधी | किशोर माळी,
महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या खजिन्यातील ७१ ऐतिहासिक व पुरातन नाण्यांसह मौल्यवान वस्तू गायब असल्याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्याकडे करण्यात आल्याने खळबळ उडाली असून या पुरातन नाण्याचा काळाबाजार झाल्याचा आरोप करण्यात आला आहे .
तुळजाभवानी मातेला निझाम , औरंगजेब , पोर्तगीज यांच्यासह बिकानेर उदयपूर लखनो बडोदा आणि इंदोर या घराण्यांतील राजे महाराजे यांनी त्यांच्या चलनातील पुरातन नाणी देवि चारणी अर्पण केली होती . या नाण्याची नोंद तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या रेकॉर्डमध्ये १९८० पर्यंत होती मात्र २००५ व २०१८ मध्ये करण्यात आलेल्या पंचनाम्यात या पुरातन ७१ नाण्यांसह प्राचीन सोन्या चांदीच्या वस्तू आणि मौल्यवान अलंकार दप्तरी नोंदीत नसल्याचे उघड झाले आहे . तुळजाभवानी पुजारी मंडळाचे माजी अध्यक्ष किशोर गंगणे व ऍड शिरीष कुलकर्णी यांनी माहितीच्या अधिकारात तुळजाभवानी मंदिर संस्थांच्या साठा नोंद दप्तराची मागणी केली होती त्यात ७१ पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाले आहे . देवीला अर्पण केलेल्या या पुरातन नाण्याचा काळाबाजार झाल्याचा संशय व्यक्त करीत चौकशी करण्याची मागणी केली आहे . तुळजाभवानी मंदिराचे धार्मिक व्यवस्थापक दिलीप नाईकवाडी यांनी चार्ज घेताना व देताना हा घोटाळा झाल्याचा आरोप तक्रारीत केला आहे .
तुळजाभवानी मातेच्या दानपेटीतील सोने चांदी अपहाराची कारवाई गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असतानाच पुरातन नाणी गायब झाल्याचे उघड झाल्याने खळबळ उडाली आहे . तुळजाभवानी मंदिर संस्थांनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी यावर काय निर्णय घेतात हे पाहावे लागेल .
सर्वात वेगवान आणि मोफत बातम्या मिळवण्यासाठी आजच आमचा whatsapp ग्रुप जॉईन करा. तसेच आमच्या फेसबुक पेजला लाईक करा
whatsapp ग्रुपची लिंक – http://bit.ly/2H9mIl1
फेसबुक पेजची लिंक – http://bit.ly/2YmZejl
महत्वाच्या बातम्या
शिवसेना जिल्हा प्रमुखाच्या चारा छावणीतील भ्रष्टाचार उघड
धक्कादायक! सुप्रिया सुळेंच्या पराभवावर शरद पवारांनी सुद्धा केले ‘हे’ विधान
सुप्रिया सुळेंना इंदापूरात आघाडी मिळण्याची शक्यता धूसरच ? तर खडकवासल्यात मिळू शकते निर्णायक पिछाडी
पार्थ पवार पराभवाच्या छायेत? मतदानानंतर वर्तवले जात आहेत उलट सुलट अंदाज
‘या’ मतदारसंघात शिवसेनेचा होऊ शकतो ‘धक्कादायक’ पराभव
अल्पवयीन मुलीवर केले अल्पवयीन मुलाने लैंगिक अत्याचार