टीम हॅलो महाराष्ट्र | तुळशीबाग गणेश मंडळाची मूर्ती फायबरची आहे. ज्येष्ठ मूर्तीकार डी. एस. खटावकर हे अनेक वर्षांपासून या गणपतीची आरास करतात. तुळशीबाग गणपती हा मानाचा चौथा गणपती आहे. या गणपतीची स्थापना १९०१ मध्ये करण्यात आली. १९७५ पहिल्यांदामध्ये फायबरच्या गणेश मुर्तीची स्थापना करण्याचा मान या मंडळाला जातो.
तुळशीबागेतल्या मोक्याच्या आणि वर्दळीच्या भागात हा गणपती बसतो. १३ फुट उंचीची ही गणेशमुर्ती अतिशय आकर्षक आणि मनोवेधक आहे. या गणपतीला ८० किलो वजनाचे चांदीची आभुषणे आहेत. कलाकार डी.एस. खटावकर गेली अनेक वर्षे या गणपतीची सजावट करत आहेत. त्यामुळे वर्षनुवर्षं या गणपतीची मूर्ती अजूनच आकर्षक दिसत आहे.