तुनिशाच्या आत्महत्येप्रकरणी शिझानच्या कुटुंबीयांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले….

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

मुंबई : हॅलो महाराष्ट्र – Tv अभिनेत्री तुनिशा शर्माच्या (tunisha sharma) आत्महत्येप्रकरणी आरोपी शिझान खानच्या कुटुंबीयांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. योग्य वेळ आल्यावर आम्ही या प्रकरणावर बोलू असे ते म्हणाले. त्याचसोबत त्यांनी खासगी आयुष्याचा आदर करावा अशी विनंती नेटकरी आणि प्रसारमाध्यांना केली आहे. तुनिशाची (tunisha sharma) आई वनिता यांच्या तक्रारीनंतर मुंबई पोलिसांनी आत्महत्येस प्रवृत्त केल्याच्या आरोपाखाली अभिनेता शिझानला अटक केली.

काय म्हणाले शिझानचे कुटुंबीय?
या प्रकरणी (tunisha sharma) शिझानची बहीण शफक नाज आणि फलक नाज यांनी म्हटलंय, “या कठीण काळात कृपया आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा. हे पाहून आम्हाला वाईट वाटतंय की लोक सतत आम्हाला फोन करत आहेत आणि माध्यमाचे प्रतिनिधी आमच्या इमारतीखाली उभे आहेत.” तसेच “या देशाच्या न्यायव्यवस्थेवर आम्हाला पूर्ण विश्वास आहे. चौकशीदरम्यान शिझान मुंबई पोलिसांना सहकार्य करत आहे. जेव्हा योग्य वेळ येईल तेव्हा आम्ही यावर बोलू. मात्र कृपा करून सध्या आमच्या खासगी आयुष्याचा आदर करा, ज्यावर आमच्या कुटुंबीयांचा हक्क आहे”, अशी विनंती कुटुंबीयांनी केली आहे.

https://www.instagram.com/p/CmGEg8ro-lW/?utm_source=ig_embed&ig_rid=b807b616-f9da-4cce-b1c9-595d4b8447e7

शिझानचे अनेक मुलींशी प्रेमसंबंध होते. त्याने तुनिशालाही (tunisha sharma) लग्नाचं आमिष दाखवून फसवलं आणि त्यामुळेच तिने आत्महत्या केली, अशा आरोप तुनिशाची आई वनिता यांनी केला आहे. तुनिशा शर्माने नेमकी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली याचा तपास पोलीस करत आहेत.

हे पण वाचा :
Senior Citizen Saving Scheme च्या व्याजदरात बदल
मुलं चोरणारा समजून नागरिकांकडून तरुणाला बेदम मारहाण, Video आला समोर
Repo Rate वाढल्यामुळे कर्ज महागणार तर FD वर मिळणार जास्त व्याज !!!
मला कुत्रा निशाणी दिली तरी मी निवडून येईल; सत्तारांचे विधान चर्चेत
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी!! UPSC अंतर्गत 253 जागांसाठी भरती