बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून, हाॅलतिकिट उद्यापासून मिळणार

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद | बारावी बोर्डाची परीक्षा २३ एप्रिलपासून राज्यभर ठरलेल्या वेळापत्रकानुसार ऑफलाइन घेतली जाणार असून, त्यानुसार आता या परीक्षेचे प्रवेशपत्र (हाॅलतिकीट) विद्यार्थ्यांना महाविद्यालयांच्या लॉगीनमध्ये उपलब्ध करून देण्यात आले आहे. शनिवार ३ एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार असून पुढे ती विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्याची जबाबदारी उच्च माध्यमिक शाळा व कनिष्ठ महाविद्यालयांची असणार आहे.

विद्यार्थ्यांना प्रिंट काढून दिल्यानंतर हॉल तिकिटावर उच्च माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांच्या मुख्याध्यापक किंवा प्राचार्यांची स्वाक्षरी आणि शिक्का आवश्यक आहे. विद्यार्थ्यांना हॉल तिकीट उपलब्ध झाल्यानंतर त्यामध्ये विषय, माध्यम, नाव व इतर काही दुरुस्ती असल्यास त्याबाबत माध्यमिक शाळा, कनिष्ठ महाविद्यालयाने मंडळामार्फत हॉल तिकिटावर दुरुस्ती करून घ्यायची आहे.

परीक्षेपूर्वी किंवा परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना दिलेले हॉल तिकीट गहाळ झाल्यास शाळा, कनिष्ठ महाविद्यालयांनी विद्यार्थ्याला द्वितीय प्रत प्रिंट करून द्यावी लागणार आहे. त्यावर डुप्लिकेट हा शेरा द्यावा, अशा सूचना बोर्डाने केल्या आहेत. शनिवार ३ एप्रिलपासून मंडळाच्या अधिकृत वेबसाईटवर महाविद्यालयांना ही प्रवेशपत्रे ऑनलाइन उपलब्ध होणार असून, पुढे ती विद्यार्थ्यांना प्रिंट स्वरूपात देण्यात येणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यासह राज्यातील सर्व महत्वाच्या ब्रेकिंग बातम्या थेट मोबाईलवर मिळवण्यासाठी आमचा WhatsApp ग्रुप Join करा

Click Here to Join Our WhatsApp Grou