Elon Musk च्या ऑफरबाबत Twitter च्या बोर्डाने दिले ‘हे’ उत्तर

ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आणि टेस्लाचे सीईओ एलन मस्क यांनी मायक्रोब्लॉगिंग साइट ट्विटर विकत घेण्याची मोठी ऑफर दिली आहे. 43.4 अब्ज डॉलरच्या या ऑफरवर ट्विटर इंकनेही गुरुवारी प्रतिक्रिया दिली.

एलन मस्क हे सध्या ट्विटरचे सर्वात मोठे सिंगल शेअरहोल्डर आहेत. त्यांनी नुकत्याच खरेदी केलेल्या कंपनीत त्यांचा जवळपास 9 टक्के हिस्सा आहे. आता मस्कला उर्वरित स्टेक विकत घेऊन ट्विटरची मालकी मिळवायची आहे.

ट्विटरने दिले ‘हे’ उत्तर
ट्विटरच्या बोर्डाने गुरुवारी सांगितले की,” ते एलन मस्कच्या प्रस्तावावर विचार करेल.” मस्ककडून कंपनीला 43.4 अब्ज डॉलर्समध्ये खरेदी करण्याची ऑफर मिळाल्याची पुष्टीही यावेळी केली.” ट्विटरने सांगितले की, कंपनीचे संचालक मंडळ या प्रस्तावाचे काळजीपूर्वक मूल्यांकन करेल. सर्व भागधारकांच्या हितासाठी जे चांगले आहे ते आम्ही घेऊ.

ट्विटरने गुरुवारी यूएस स्टॉक मार्केटला पाठवलेल्या माहितीमध्ये सांगितले आहे की, एलन मस्कने कंपनीचे उर्वरित शेअर्स $ 54.20 प्रति शेअर या दराने खरेदी करण्याची ऑफर दिली आहे. या किंमतीची एकूण रक्कम सुमारे $43 अब्ज असेल.

मस्कचा हिस्सा विकण्याचा इशारा!
टेस्ला आणि स्पेसएक्स सारख्या कंपन्यांचे मालक मस्क यांनी ही शेवटची आणि सर्वोत्तम ऑफर असल्याचे म्हटले आहे. ही ऑफर स्वीकारली नाही तर मी शेअरहोल्डर म्हणून माझ्या पदाचा पुनर्विचार करेन, असेही मस्क म्हणाले. म्हणजेच ते कंपनीतील त्यांचे स्टेक विकू शकतात.

मस्कच्या गुंतवणुकीची माहिती मिळाल्यापासून ट्विटरच्या शेअर्समध्ये चांगलीच वाढ झाली आहे. या महिन्याच्या सुरुवातीपासून ट्विटरच्या स्टॉकमध्ये 18.5 टक्के वाढ झाली आहे.

Leave a Comment