हॅलो महाराष्ट्र ऑनलाईन । आज संपूर्ण भारतभर आज जनता कर्फ्यू पळाला जात आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या आवाहनाला उत्फुर्त प्रतिसाद पहायला मिळत आहे. देशभरात सकाळी ७ ते सायंकाळी ९ या वेळेत ‘जनता कर्फ्यू’ सुरु आहे. जनता कर्फ्यूला देशभरातील अनेक राज्यांमधून सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे. रेल्वे स्थानक, बसस्थानक, उद्यान, दुकान, रस्ते सर्व ओस पडले आहेत. आज करोडो भारतीयांनी घरामध्येच बसण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र सोशल मीडियावरील उत्साहामध्ये थोडाही फरक पडलेला जाणवत नाही.
याच एक उत्तम उदाहरण म्हणजे केंद्रीय मंत्री स्मृती इराणी याच्या एक ट्विट. इतर वेळी ट्विटरवरून महत्वाच्या सूचना आणि राजकीय भाष्य करणाऱ्या स्मृती इराणी यांनी संपूर्ण देशालाच ट्विटवर अंतारक्षरी खेळण्याचं आवाहन केलं आहे. इराणी यांनी #twitterAntakshri हा हॅशटॅग वापरुन चला अंताक्षरी खेळू असं म्हटलं आहे. स्मृती इराणींच्या या आवाहनाला तितक्याच खिलाडू वृत्तीनं ट्विटरकरांनी प्रतिसाद दिला आहे. सध्या ट्विटरवर #twitterAntakshri हा हॅशटॅग सध्या टॉप ट्रेण्डींगमध्ये आहे.
We are a 130 crore family so tag karna mushkil hai ki next kaun gaana uthayega isiliye sing / tweet a song coz ye apni marzi wala #TwitterAntakshari hai ..
— Smriti Z Irani (@smritiirani) March 22, 2020
दिवसभरातील बातम्या तुमच्या मोबाईलवर मिळवण्यासाठी 8080944419 या नंबरवर ”Hello News” टाईप करून त्वरित Whatsapp करा.