Saturday, June 3, 2023

काश्मीरमध्ये बीएसएफच्या पथकावर दहशतवाद्यांचा हल्ला; २ जवान शहीद

श्रीनगर । जम्मू-काश्मीरची राजधानी श्रीनगरच्या पंदाच भागात सीमा सुरक्षा बलाच्या (बीएसएफ) पथकावर दहशतवाद्यांनी मोठा हल्ला केला आहे. या हल्ल्यात बीएसएफचे २ जवान शहीद झाले. तर या हल्ल्यात जखमी झालेल्या इतर जवानांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. या हल्ल्यात भारतीय जवान गंभीर जखमी झाल्यानंतर त्यांची हत्यारे दहशतवाद्यांनी पळवल्याचेही वृत्त मिळत आहे.

या हल्ल्याबाबत मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, सीमा सुरक्षा दलाच्या ३७ बटालियन गस्त घालून परतत असताना दहशतवाद्यांनी अचानक त्यांच्यावर हल्ला केला. हा हल्ला अचानक झाल्याने जवानांना सावरण्यासाठी जराही वेळ मिळू शकला नाही. या हल्ल्यानंतर इतर जवान आणि स्थानिक लोकांनी तातडीने जखमी जवानांना नजिकच्या रुग्णालयात नेले.

दहशतवाद्यांच्या या हल्ल्यात एकूण ७ जवान जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. या ७ जवानांपैकी २ जवान गंभीर जखमी झाले होते. त्यामुळे त्यांना स्किम्स सौरा येथे हलवण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, तेथे हलवताना ते वाटेतच शहीद झाले.

ब्रेकिंग बातम्या मोबाईलवर मिळवण्यासाठी आम्हाला 7972630753 या नंबरला WhatsApp करा आणि लिहा “Hello News.”