निकृष्ट प्रेशर कुकर विकणाऱ्या ‘या’ दोन ई-कॉमर्स कंपन्यांना ठोठावण्यात आला प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड

0
72
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

नवी दिल्ली । केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणाने (CCPA) ई-कॉमर्स कंपनी पेटीएम मॉल आणि स्नॅपडील यांना भारतीय मानक ब्युरो (BIS) च्या नियमांचे उल्लंघन करून प्रेशर कुकर विकल्याबद्दल प्रत्येकी एक लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. या प्रेशर कुकरने घरगुती प्रेशर कुकर (गुणवत्ता नियंत्रण) ऑर्डर-2020 (QCO) चे पालन केले नाही.

कंपन्यांनी विकलेले हे प्रेशर कुकर परत मागवून ग्राहकांनी भरलेली रक्कम परत करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. पेटीएम मॉलने प्रिस्टाइन आणि क्यूबन कंपन्यांचे प्रेशर कुकर विकले होते मात्र त्यांच्या विवरणात स्पष्ट दिसत होते की या कुकरला ISI मार्क नाही. तर दुसरीकडे, Snapdeal ने Saransh Enterprises आणि Ezee Sellers कडील कुकर विकले जे विहित स्टॅण्डर्ड नुसार नव्हते.

कंपन्या जबाबदारी टाळू शकत नाहीत
स्नॅपडीलने नियामकांसमोर सादर केलेल्या निवेदनात म्हटले गेले आहे की, ते फक्त एक मध्यस्थ आहे आणि विक्रेत्याद्वारे त्यांच्या प्लॅटफॉर्मवर विकल्या जाणार्‍या सामग्रीशी संबंधित माहितीसाठी ते जबाबदार नाहीत. यावर नियामकाने सांगितले की,”तुम्ही तुमच्या प्लॅटफॉर्मवरील प्रत्येक व्यवहारातून नफा कमावता, अशा परिस्थितीत कंटेंटशी संबंधित अशा बाबी समोर आल्यावर तुम्ही तुमची जबाबदारी टाळू शकत नाही.” नियामकाने 45 दिवसांत अनुपालन रिपोर्ट सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

आदेशाला आव्हान देणार स्नॅपडील
स्नॅपडीलने म्हटले आहे की, यासाठी ग्राहक हित सर्वोपरि आहे मात्र ते नियामकाच्या या निर्णयाला आव्हान देईल. Snapdeal नुसार, नियामकाने BIS कायदा, कोप्रा आणि ग्राहक संरक्षण (ई-कॉमर्स) नियम 2020 अंतर्गत अशा प्रकरणांमध्ये मार्केटर आणि विक्रेत्याच्या जबाबदाऱ्या निश्चित केल्या आहेत, ज्याकडे दुर्लक्ष केले गेले आहे. मात्र, स्नॅपडीलने असेही म्हटले आहे की, ज्या ग्राहकांना हे दोषपूर्ण कुकर विकले गेले होते त्या सर्व ग्राहकांना ते मानक अनुपालन प्रेशर कुकर पाठवेल.

खराब प्रेशर कुकरबाबत यापूर्वीच नोटिसा बजावल्या होत्या
याआधीही नोव्हेंबरमध्ये BIS मानकांकडे दुर्लक्ष करून प्रेशर कुकर विकल्याबद्दल ई-कॉमर्स कंपन्यांना नोटिसा बजावण्यात आल्या आहेत. या कंपन्यांमध्ये Amazon, Flipkart, Snapdeal, ShopClues आणि Paytm Mall यांचा समावेश आहे. 14 मार्च रोजी, ग्राहक व्यवहार मंत्रालयाने माहिती दिली होती की,” BIS ने ISI चिन्ह नसलेले 1,032 प्रेशर कुकर जप्त केले आहेत.”

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here