शेतातील काम उरकून घरी जाणाऱ्या दोन महिलांना टेम्पोची धडक, दोघांचाही जागीच मृत्यू

accident
ताज्या मराठी बातम्यांसाठी आमचा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

औरंगाबाद : हॅलो महाराष्ट्र – औरंगाबादमध्ये एक भीषण अपघात (accident) झाला आहे. यामध्ये शेतातून मोल मजुरी करुन घरी परतताना दोन महिलांना टेम्पोने धडक दिली आहे. वैजापूर तालुक्यातील मणुर या ठिकाणी हा अपघात (accident) झाला आहे. या अपघातात दोघींचाही जागीच मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे दवंगे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

ठगनबाई विश्वनाथ दवंगे आणि मंगल आसाराम दवंगे अशी अपघातात (accident) मरण पावलेल्या महिलांची नावे आहेत. या दोघी शेतातून मोल मजुरी करुन घरी पायी परतत असताना साकेगाव कडुन मणुरकडे येणाऱ्या टेम्पोने जोराची धडक दिली. या अपघातानंतर (accident) टेम्पो चालकाने घटनास्थळावरून पळ काढला आहे. शिऊर पोलीस या अपघाताचा पुढील तपास करत आहेत.

दोन दिवसांपूर्वी औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात
नागपूर-औरंगाबाद महामार्गावर नांदगाव खंडेश्वर तालुक्यात शिंगणापूर फाट्या जवळ दोन ट्रकचा समोरासमोर भीषण अपघात (accident) झाला आहे. दरम्यान दोन्ही ट्रकचा अपघात इतका भीषण होता कि त्यातील चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. महामार्गावरील खड्डा वाचवताना हा भीषण अपघात झाला होता. या अपघातामूळे महामार्गावरील वाहतूक बराच काळ खोळंबल्याने लांबपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.

हे पण वाचा :
‘या’ सरकारी योजनेमध्ये फक्त 1,000 रुपयांच्या गुंतवणूकीद्वारे मिळवा दुप्पट पैसे !!!

येत्या निवडणुकीत भाजपसोबत युती करणार का?; राजू शेट्टींनी दिलं ‘हे’ उत्तर

सोमय्यांनी ठाकरेंबद्दल बोलू नये, अन्यथा आम्हांला सत्तेची पर्वा नाही; बंडखोर आमदार आक्रमक

2022 मध्ये ‘या’ तीन शेअर्सने दिला 3,000 टक्क्यांपर्यंत रिटर्न !!!

संजय राऊतांच्या विरोधात अटक वॉरंट जारी; नेमकं काय आहे प्रकरण?